शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 17:01 IST

बारावी परीक्षेतील उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम सुरू झाले आहे. नियामकांच्या बैठका होऊन उत्तरपत्रिकांचे गठ्ठे परीक्षकांकडे पाठविण्यात येत आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागात विनाअनुदानित शिक्षकांनी परीक्षा कामकाजावर टाकलेल्या बहिष्काराचा परिणाम झालेला नाही.

ठळक मुद्देबारावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी सुरूकोल्हापूर विभागातील कार्यवाही; बहिष्काराचा परिणाम नाही

कोल्हापूर : बारावी परीक्षेतील उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम सुरू झाले आहे. नियामकांच्या बैठका होऊन उत्तरपत्रिकांचे गठ्ठे परीक्षकांकडे पाठविण्यात येत आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागात विनाअनुदानित शिक्षकांनी परीक्षा कामकाजावर टाकलेल्या बहिष्काराचा परिणाम झालेला नाही.परीक्षा दि. १८ फेब्रुवारीपासून सुरू झाली. मंगळवारपर्यंत इंग्रजी, मराठी, हिंदी, ऊर्दू, सहकार, राज्यशास्त्र, भौतिकशास्त्रासह किमान कौशल्य अभ्यासक्रमाचे (एमसीव्हीसी) एकूण २९ पेपर झाले आहेत.

पेपर झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी उत्तरपत्रिका तपासणीबाबत काही शंका असल्यास त्याबाबत चर्चा करून उत्तरपत्रिका या तपासणीसाठी मुख्याध्यापक, प्राचार्यांच्या माध्यमातून परीक्षकांकडे पाठविण्यात येत आहे. नऊहून अधिक उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू झाले आहे.

विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन कृती समितीने बारावी परीक्षेचे कामकाज आणि उत्तरपत्रिका तपासणीवर, तर राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने बारावी आणि दहावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे. त्याबाबतची माहिती या संघटनांचे निवेदन मिळाल्यानंतर लगेचच राज्य शिक्षण मंडळाला कळविले आहे. मंडळाच्या सूचनेनुसार बारावी परीक्षेचे कामकाज कोल्हापूर विभागात सुरू असल्याचे सचिव आवारी यांनी मंगळवारी सांगितले. 

 

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाkolhapurकोल्हापूर