शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

निकालाच्या सुत्राने उडवली बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप; दहावी-अकरावीच्या गुणांनी वाढवली चिंता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 13:38 IST

CoronaVirus Education Sector Kolhapur : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने यावर्षी बारावीची परीक्षा रद्द केली. दहावीतील ३० टक्के, अकरावीतील ३० टक्के आणि बारावीतील ४० टक्के अंतर्गत गुणांच्या आधारे सरासरी काढण्याच्या सुत्राव्दारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून निकाल जाहीर केला जाणार आहे.

ठळक मुद्देदहावी-अकरावीच्या गुणांनी वाढवली चिंता!सरासरी गुण मिळणार : महाविद्यालयांमध्ये मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू

संतोष मिठारीकोल्हापूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने यावर्षी बारावीची परीक्षा रद्द केली. दहावीतील ३० टक्के, अकरावीतील ३० टक्के आणि बारावीतील ४० टक्के अंतर्गत गुणांच्या आधारे सरासरी काढण्याच्या सुत्राव्दारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून निकाल जाहीर केला जाणार आहे.

यातील अकरावीच्या वर्षाला बहुतांश विद्यार्थी हे रेस्ट ईअर मानतात. या वर्षामध्ये बारावीची तयारी करण्यावर भर देतात. त्यामुळे निकालाच्या सुत्राने बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप उडवली आहे. त्यांना गुणांची चिंता लागली आहे.जिल्ह्यातील एकूण ५२,२९९ विद्यार्थ्यांनी यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यात सीबीएसईचे ५५०, तर राज्य शिक्षण मंडळाचे (स्टेट बोर्डाचे) ५१,७४९ विद्यार्थी आहेत. राज्य शिक्षण मंडळाने सीबीएसई शिक्षण मंडळाच्या धोरणावर अवलंबून असणारे जाहीर केले.

दहावीमध्ये अभ्यास करून चांगले गुण मिळवले. पुढे बारावीचे वर्ष महत्त्वाचे असल्याने अकरावीमध्ये केवळ उत्तीर्ण होण्यापुरता अभ्यास केला. त्यातच वार्षिक परीक्षाही झाली नाही. आता बारावीचे मूल्यमापन करताना अकरावीतील ३० टक्के गुणांचा विचार केला जाणार आहे. त्याचा फटका बसण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे.जिल्ह्यातील बारावीचे विद्यार्थी

  • सीबीएसईचे विद्यार्थी : ५५०
  • स्टेट बोर्डाचे विद्यार्थी : ५१७४९

३० टक्के सूत्रं गणित बिघडवणारकोरोनामुळे बारावीचा अंतिम निकाल हा दहावी, अकरावी आणि बारावीच्या गुणांच्या आधारे जाहीर होणार आहे. अकरावीला बहुतांश विद्यार्थ्यांना कमी गुण असतात. त्याचा बारावीच्या गुणांवर परिणाम होणार आहे. कमी गुण मिळाल्यास पुन्हा परीक्षा देण्याची आमची तयारी आहे.- संगीता घाडीगावकर,रूईकर कॉलनी

बारावीमध्ये वर्षभर तयारी करायची असल्याने अकरावीमध्ये केवळ उत्तीर्ण होण्यापुरता अभ्यास केला. आता यावर्षी परीक्षा होणार नाही. बारावीच्या अंतिम मूल्यांकनामध्ये अकरावीच्या गुणांचा विचार केला जाणार असल्याने गुणांबाबत थोडी चिंता वाटत आहे.- तेजस पोवार, वळीवडे

विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवावाबारावीच्या विद्यार्थ्यांना यावर्षी मिळणाऱ्या गुणांचा अधिक विचार करू नये. यापुढे त्यांना काही प्रवेश परीक्षा द्याव्या लागणार आहेत. त्यातील चांगल्या यशासाठी अभ्यासावर फोकस ठेवावा.- डॉ. सरदार जाधव,प्राचार्य, डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल.

 

दहावी, अकरावीतील गुण हे बेस्ट ऑफ थ्री सुत्रानुसार मिळणार आहेत. त्यामुळे शक्यतो विद्यार्थ्यांना कमी गुण मिळणार नाहीत. विद्यार्थ्यांनी यापुढील परीक्षा आणि आव्हानांचा सामना करण्यासाठी स्वत:ची शैक्षणिक गुणवत्ता, कौशल्य वाढवावीत.- मुकुंद कांबळे,शिक्षक, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEducation Sectorशिक्षण क्षेत्रHSC / 12th Exam12वी परीक्षा