शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
3
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
4
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
5
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
6
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
7
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
8
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
9
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
10
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
11
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
12
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
13
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
14
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
15
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
16
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
17
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
18
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
19
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
20
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला

दिवाळीत कोट्यवधींची उलाढाल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, दागिन्यांच्या खरेदीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 12:01 IST

दिवाळीमुळे बाजारपेठेत खरेदीसाठी उत्साहाचे वातावरण होते. यामध्ये टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, मोबाईलची दुकाने हाऊसफुल्ल होती. सोने-चांदीच्या दागिन्यांसाठीही गुजरी आणि राजारामपुरीतील दुकाने गर्दीने फुलून गेली होती. दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये सुमारे ३०० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.

ठळक मुद्देदिवाळीत कोट्यवधींची उलाढालइलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सोने-चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी गर्दी

कोल्हापूर : दिवाळीमुळे बाजारपेठेत खरेदीसाठी उत्साहाचे वातावरण होते. यामध्ये टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, मोबाईलची दुकाने हाऊसफुल्ल होती. सोने-चांदीच्या दागिन्यांसाठीही गुजरी आणि राजारामपुरीतील दुकाने गर्दीने फुलून गेली होती. दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये सुमारे ३०० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.मंदी आणि महापूर यांमुळे बाजारपेठेत शुकशुकाट पाहण्यास मिळत होता. दिवाळीत मात्र, चित्र वेगळे पाहण्यास मिळाले. लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या सणांचे औचित्य साधत ग्राहकांनी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती. त्यामुळे अपेक्षित व्यवसाय झाल्याच्या प्रतिक्रिया व्यावसायिकांकडून येत आहेत.

या दोन दिवसांमध्ये घरगुती वस्तूंसह इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सोने-चांदीच्या दागिन्यांसाठी बाजारपेठ फुलून गेली होती. दुचाकी-चारचाकीची वाहनखरेदीसाठीही गर्दी झाली. सोने-चांदीसह फ्रिज, वॉशिंग मािीन, ओव्हन, नवीन मोबाईल, होम थिएटरच्या खरेदीसाठी ग्राहकांचा सर्वाधिक कल होता. महाद्वार रोड, पापाची तिकटी, गुजरी, शाहूपुरी, राजारामपुरी, शिवाजी स्टेडियम येथील शोरूममध्ये रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची लगबग पाहण्यास मिळाली. दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये कोट्यवधींची उलढाल झाली.आकर्षक योजनादिवाळीमध्ये पाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याने विविध कंपन्यांनी उत्पादनाची जास्तीत जास्त विक्री होण्यासाठी आकर्षक योजना आणल्या होत्या. या योजनांचा कोल्हापूरकरांनी लाभ घेतला. शून्य टक्के कर्जयोजना, स्क्रॅर्च कार्ड आणि ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.पावसाने दिली उघडीपदिवाळीच्या चार दिवस अगोदर कोल्हापूरला मुसळधार पावसाने झोडपले. ऐन दिवाळीवेळीच पावसाने उघडीप घेतल्याने ग्राहकांसह व्यावसायिकांना दिलासा मिळाला. बाजारपेठेमध्ये उत्साही वातावरण पाहण्यास मिळाले.

महापुरामुळे मागील वर्षाच्या तुलनेत २५ टक्के व्यवसायावर परिणाम झाला आहे. याचबरोबर मंदी आणि भाववाढीमुळे दिवाळीमध्ये व्यवसाय होईल का, याबाबत संभ्रम होता. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली. भाऊबीजेदिवशीही गर्दी कायम होती. या दिवाळीतील हंगाम अपेक्षेपेक्षा चांगला झाला.- मुरलीधर चिपडे, चिपडे सराफ

वॉशिंग मशीन, एलईडी टीव्ही, मोबाईल खरेदीसाठी ग्राहकांचा सर्वाधिक कल होता. पाडवा आणि भाऊबीजेदिवशी सुदैवाने पावसानेही साथ दिली. त्यामुळेच ग्राहक मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाहेर पडले. मंदीचे सावट असतानाही पाडव्याला अपेक्षापेक्षा जास्त व्यवसाय झाला.- दीपक केसवाणी, राजाकाका

 

टॅग्स :Diwaliदिवाळीkolhapurकोल्हापूर