शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बिद्री कारखान्याची ऊसतोडणी बंद

By admin | Updated: November 23, 2014 00:37 IST

तांत्रिक बिघाड : बॉयलर ट्युबला गळती; लाखो रुपयांचे नुकसान

सरवडे : बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यात यावर्षी बसविलेल्या नवीन बॉयलर ट्युबमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने काल, शुक्रवारी सायंकाळपासून कार्यक्षेत्रातील २१८ गावांत ऊसतोडणी बंद करण्यात आली आहे. यामुळे कारखान्याच्या तसेच वाहनतळावरील वाहनातील ऊस, शेतात तुटलेला ऊस यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बिद्री साखर कारखाना नुकताच सुरू झाला. आजचा गळिताचा दहावा दिवस आहे. आतापर्यंत एकूण २७ हजार ३५० मे. टनांचे गाळप झाले. त्यातून १९ हजार ३५० साखर पोत्यांचे उत्पादन झाले. चार दिवसांपूर्वीच अवकाळी पावसामुळे तीन दिवस हंगाम बंद ठेवावा लागला. त्यामुळे कारखाना व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काल, शुक्रवारी सायंकाळी कारखान्यात कोट्यवधी रुपये खर्चून नवीन बसविलेल्या बॉयलरच्या चार ट्युबमध्ये गळती लागल्याने पुन्हा कारखान्याचा गळीत हंगाम बंद ठेवावा लागणार आहे. हा तांत्रिक बिघाड काढण्यासाठी बॉयलर गार करावा लागणार आहे. त्यामुळे किती दिवसांनी काम पूर्ण होणार याकडे ऊस उत्पादक व वाहनधारकांचे लक्ष लागून राहिले आहे. सध्या वाहन तळावर उसाने भरलेले ९२ ट्रक, ३२५ ट्रॅक्टर-ट्रॉली, ९० बैलगाड्या अशी ५०७ वाहने उभी आहेत. शेतात तुटून पडलेला ऊस तसाच वाळत पडला, तर ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान होणार आहे. बॉयलरचा बिघाड काढण्यासाठी कारखाना बंद ठेवावा लागणार असून, पुन्हा एकदा बॉयलर ट्युबचा प्रश्न चर्चेत आला आहे, तर याबाबत ऊस फडात चर्चा सुरू आहे. (वार्ताहर)