शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

तुळशी धरण तुडुंब, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 18:20 IST

कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी पावसाची उघडझाप राहिली. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, पण त्यानंतर उघडीपच राहिली. राधानगरी तालुक्यातील तुळशी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यातून प्रतिसेकंद २५२ घनफूट पाणी प्रवाहित झाले आहे.

ठळक मुद्देतुळशी धरण तुडुंब, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझापजिल्ह्यात सरासरी ८.६१ मिलिमीटर पाऊस

कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी पावसाची उघडझाप राहिली. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, पण त्यानंतर उघडीपच राहिली. राधानगरी तालुक्यातील तुळशी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यातून प्रतिसेकंद २५२ घनफूट पाणी प्रवाहित झाले आहे.गेले दोन आठवडे असणारा पावसाचा जोर काहीसा ओसरला असून मंगळवारी सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत राहिल्या. कोल्हापूर शहरात सकाळपासूनच उघडीप राहिली, दिवसभर काहीवेळ ऊन होते. सायंकाळनंतर पावसाची भुरभुर सुरू झाली. धरणक्षेत्रातही पाऊस सुरू असल्याने तुळशी धरण मंगळवारी सकाळी सहा वाजता पूर्ण क्षमतेने भरले. ‘तुळशी’ धरणाची ३.४७१ टी. एम. सी. क्षमता आहे.जिल्ह्यात सरासरी ८.६१ मिलिमीटर पाऊस आहे. सर्वाधिक पाऊस शाहूवाडी तालुक्यात १९.५० मिलिमीटर झाला आहे. गगनबावडा, भुदरगड, चंदगड तालुक्यातही चांगला पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर ओसरल्याने नद्यांची पाणी पातळी कमी झाली आहे. पंचगंगेची पाणी पातळी सोमवारपेक्षा मंगळवारी साडेतीन फुटांनी कमी झाली आहे. अजूनही बारा बंधारे पाण्याखाली आहेत. 

 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018kolhapurकोल्हापूर