शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
2
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
3
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
4
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
5
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
6
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
7
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
8
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
9
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
10
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
11
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
14
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
15
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
16
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
17
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
18
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
19
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
20
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
Daily Top 2Weekly Top 5

मामेभावाला आपटून ठार मारण्याचा प्रयत्न

By admin | Updated: July 20, 2015 01:07 IST

सीपीआर आवारातील घटना : कौटुंबिक वादाचे पर्यवसान; दोन्ही बाजूंचे आठजण ताब्यात

कोल्हापूर : चिंचवडे (ता. करवीर) येथे रविवारी सकाळी मामेभावात झालेल्या हाणामारीचे पडसाद पुन्हा सीपीआर आवारात उमटले. वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या मामेभावास चौघा जणांनी जमिनीवर आपटून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये अंकुश दगडू मोहिते (वय ३२) हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या आठजणांना ताब्यात घेतले. याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अंकुश दगडू मोहिते व सर्जेराव आनंदा सावंत हे दोघे मामेभाऊ आहेत. त्यांच्यात पूर्वीपासून कौटुंबिक वाद आहे. रविवारी सकाळी अंकुशच्या घरी पाहुणे रणजित साठे हे आले होते. यावेळी सर्जेराव सावंत याच्याशी वाद झाला. त्यातून या मोहिते व सावंत या दोन कुटुंबांत जोरदार हाणामारी झाली. त्यामध्ये दोन्ही बाजूंचे चौघेजण जखमी झाले. त्यानंतर दोघांनीही करवीर पोलिसांत परस्परविरोधी फिर्याद दिली. पोलिसांनी त्यांना सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यास पाठविले. दोन कुटुंबांतील जखमी सीपीआरमध्ये आमने-सामने आल्याने गोंधळ उडाला. याठिकाणी ते एकमेकांस शिवीगाळ करू लागले. त्यामुळे सीपीआर चौकीतील हवालदाराने मोहिते कुटुंबीयास सीपीआर आवारातील मारुती मंदिराशेजारी थांबण्यास सांगितले. त्यानुसार अंकुश, त्याची आई हौसाबाई, चुलते मधुकर व चुलती शोभा असे चौघेजण बसून राहिले. यावेळी सर्जेराव सावंत व त्याचे नातेवाईक अपघात विभागात उपचार घेत होते. उपचारानंतर बाहेर आल्यानंतर सर्जेराव सावंत, भैरवनाथ सावंत व सागर सावंत या तिघांनी अंकुशला ठार मारण्याचा उद्देशाने जमिनीवर आपटून मारहाण केली. दरम्यान, या घटनेची माहिती लक्ष्मीपुरी व करवीर पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे, करवीर पोलीस उपअधीक्षक अमर जाधव, पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे, पोलीस उपनिरीक्षक युवराज आठरे यांनी सीपीआरमध्ये भेट देऊन मारहाणीची माहिती घेतली. यावेळी दोन्ही बाजूंच्या सात ते आठ संशयितांना ताब्यात घेऊन लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आणले. याठिकाणी काही संघटनेच्या नेतेमंडळींनी दोन्ही कुटुंबांत मध्यस्थी करत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल करून संशयितांना अटक केली. ...संपवा त्याला सर्जेराव सावंत याची आत्या सदर बझारमध्ये राहते. तिला मारहाणीची माहिती मिळाल्याने ती सीपीआरमध्ये आली. मारुती मंदिरासमोर मोहिते कुटुंबीय बसल्याचे पाहून तिने अंकुशला संपवा, अशी चेतावणी देताच सर्जेराव सावंत, भैरवनाथ सावंत, सागर सावंत या तिघांनी थेट त्याच्यावर हल्ला केला. त्याचे दोन्ही पाय धरून फिरवून जमिनीवर आपटले. त्यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो बेशुद्ध पडला, अशी माहिती सीपीआरच्या सुरक्षा रक्षकाने लक्ष्मीपुरी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. सुरक्षा रक्षकांमुळे अनर्थ टळला ‘सीपीआर’चे सुरक्षा रक्षक रंगराव पाटील, आर. पी. जाधव, रंगराव मोरे, बसवराज चौगले हे चौघेजण सकाळी ड्युटीवर होते. त्यांच्यासमोरच अंकुशला जमिनीवर आपटले. हा प्रकार पाहून या चौघांनी संशयितांवर लाठीहल्ला करून त्यांना पकडून लक्ष्मीपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप केल्याने जखमी अंकुशचे प्राण वाचले. टपरीचालकास मारहाण सीपीआरच्या बाहेर अर्जुन राणे यांची चहाची गाडी आहे. महिलांचा आरडाओरड ऐकून ते धावत सीपीआर आवारात आले. त्यांनी मारहाण करणाऱ्या तरुणांना ‘मारू नका, मरेल तो,’ असे म्हटले. त्यावर संशयितानी त्यांना कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली.