शहरं
Join us  
Trending Stories
1
आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी
2
PM मोदींचा स्वदेशी नारा; जनतेला पत्र; ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बुलंद करण्यासाठी प्रयत्न करा
3
बाधित क्षेत्र ३ हेक्टर मानून मदत; राज्य सरकारचा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ
4
अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले १६४ कोटी रुपये, १२ हजारांवर पुरूष तर अपात्र महिला ७७ हजार
5
मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ऐन दिवाळीत पावसाचा बार; पुढील तीन दिवस असेच वातावरण राहणार
6
उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज
7
बिहार निवडणूक २०२५: १२१ मतदारसंघांत एकूण १,३१४ उमेदवार; महिला मतदारांच्या आधारे ‘जदयु’ बळकट
8
“महाआघाडीला नव्हे, भाजप जनसुराजला घाबरतेय; आमचे उमेदवार फोडतेय”; प्रशांत किशोर यांचा आरोप
9
...तर H1B व्हिसाधारकांना वाढीव शुल्क लागणार नाही; पण वाढ कायम; ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टता
10
७ दिवसांत ३३ हजारांनी घसरला दर; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ८ हजारांनी गडगडली चांदी!
11
सर्व न्यायालयांमधील ‘सू’ व्यवस्था दयनीय; देशातील सर्व हायकोर्टांचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर
12
विभक्त पती, आईला फ्लॅटमध्ये राहण्यास हायकोर्टाची परवानगी; नेमके प्रकरण काय?
13
नवी मुंबई-पनवेलमध्ये आगीत ६ जणांचा मृत्यू; ठाण्यात एकाच दिवशी आगीच्या सहा घटना
14
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
15
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
16
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
17
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
18
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
19
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
20
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा

आदर्श नागरिक बनण्याचा प्रयत्न करा

By admin | Updated: January 2, 2015 00:16 IST

विद्या ठाकूर : जयसिंगपूरमध्ये भाजपचा जिल्हा महिला मेळावा उत्साहात

जयसिंगपूर : पालकांनी मुलांना शिक्षण व घरातील संस्कार देऊन आदर्श नागरिक बनविण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. त्यासाठी महिला व बालकल्याण विकास योजना राबविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा व महिला व बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी केले.येथील दि मर्चंट असोसिएशनच्या सभागृहात भाजप मंडलाच्यावतीने जिल्हास्तरीय महिला मेळावा पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आमदार सुरेश हाळवणकर होते. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस बाबा देसाई, धोंडिराम जावळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शुभदा जोशी, उपाध्यक्षा शैलजा पाटील, जिल्हा परिशद सदस्या विजया पाटील, रेश्मा सनदी, रामभाऊ चव्हाण, पुंडलिक जाधव, शंकर बिराजदार यांची उपस्थिती होती. ठाकूर म्हणाल्या, मतदारांच्या पाठबळामुळेच देशात व राज्यात भाजपकडे एकहाती सूत्रे आली आहेत. महिला व बालविकास योजना राबविण्यासाठी महिलांसाठी प्रबोधन कार्यशाळा घेणे आवश्यक आहे. यावेळी आमदार हाळवणकर म्हणाले, येत्या स्थानिक स्वराज संस्था व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही भाजपची ताकद वाढणार आहे. जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीत पक्षाची सत्ता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या मेळाव्याच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिंगाडे व महादेवी मुडशी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. रागिणी शर्मा यांनी स्वागत केले. जयसिंगपूर मंडलचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्यास मोहनराव कुलकर्णी, राजेंद्र दार्इंगडे, मिलिंद भिडे, महावीर तकडे, राजेंद्र देशमुख, सायली कुलकर्णी, माधुरी कुलकर्णी, विनोद कनकानी, शैलेश गाडे, पोपट पुजारी, सुनील शर्मा, आण्णासाहेब पवार उपस्थित होते. रमेश यळगुडकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)