शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

अ‍ॅस्ट्रोटर्फसाठी प्रयत्न करणार

By admin | Updated: August 30, 2015 00:58 IST

पी. शिवशंकर : मेजर ध्यानचंद जयंती व क्रीडादिन कार्यक्रम ; यशस्वी खेळाडूंचा सत्कार

कोल्हापूर : कोल्हापूरची हॉकी परंपरा मोठी असून, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे अ‍ॅस्ट्रोटर्फ बसवण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करू, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले. हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त अर्थात क्रीडा दिनप्रसंगी ते शनिवारी सकाळी मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे जिल्हा क्रीडा कार्यालय व कोल्हापूर जिल्हा हॉकी असोसिएशन यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शिवशंकर म्हणाले, कोल्हापुरात हॉकीसाठी कार्यरत असणारी संस्था आणि शहरातून राष्ट्रीय पातळीवर चमकणारे खेळाडू पाहिले की, या खेळाडूंना आणखी सुविधा दिल्यास हे खेळाडू नक्कीच कोल्हापूरचे नाव सातासमुद्रापार नक्कीच नेतील. त्यांच्याकरिता महापालिकेकडून जी सुविधा देता येईल, ती सुविधा दिली जाईल. याशिवाय शासनाकडे या मैदानावर अ‍ॅस्ट्रोटर्फ कृत्रिम हिरवळ बसविण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रीयस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यामध्ये निकाता प्रभू (जलतरण), कुणाल पारकर(शूटिंग), नंदिनी साळोखे (कुस्ती), राजवर्धन नाईक (जलतरण), युगंधरा शिर्के (जलतरण), करुणा पाटील (तायक्वोंदो), अक्षय देशमुख (हँडबॉल), अवधूत परुळेकर (जलतरण), श्वेता पाटील (हॉकी), रमा पोतनीस (हॉकी), रेवती पाटील (वुशू), केतन जावळे (हॉकी), वीरधवल जाधव (फुटबॉल), आकाश पोवार (बेल्ट रेसलिंग), गणेश पाटील (हॉकी), प्राजक्ता किडगावकर (हॉकी), सृष्टी नलवडे (कुस्ती) यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी माणिकराव वाघमारे, कोल्हापूर जिल्हा हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष विजय-सरदार साळोखे, उपाध्यक्ष कुमार आगळगावकर, अनिल मुळे, नजीर मुल्ला, नगरसेवक दिलीप भुर्के, भूपाल शेटे, जगमोहन भुर्के, अनिल परांडेकर, दत्ता सोळंकी, मनपा क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, सागर जाधव, बालाजी केंद्रे, एल. जी. पवार, मोहन भांडवले, आदी उपस्थित होते. ( प्रतिनिधी )