शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

१६ नोव्हेंबरला पुन्हा रणशिंग

By admin | Updated: November 6, 2015 00:32 IST

टोल विरोधी आंदोलन : एन. डी. पाटील यांचा इशारा

कोल्हापूर : कोल्हापुरात आयआरबीच्या टोलवसुलीला शासनाने दिलेली तीन महिन्यांच्या स्थगितीची मुदत संपत आली आहे, टोलनाक्यांवर पुन्हा झाडलोट सुरू झाल्याने टोलवसुली पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. शासनाचा हा डाव हाणून पाडण्यासाठी येत्या १६ नोव्हेंबरला पुन्हा टोलला हद्दपार करण्यासाठी रणशिंग फुंकले जाणार असल्याची घोषणा ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी यावेळी केली. कोल्हापूर शहर व जिल्हा टोलविरोधी कृती समितीच्यावतीने टोलला हद्दपार करण्यासाठी आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यासाठी मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिर येथे बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील बोलत होते. यावेळी महापालिकेत महापौर, उपमहापौर निवड असली तरीही त्याचा आपल्याशी काहीही संबंध नाही. सोमवारी (दि. १६) सकाळी साडेदहा वाजता शिरोली टोलनाक्यावर कार्यकर्त्यांनी जमावे, तेथे टोलवसुली सुरू असेल तर ती पूर्ण ताकदीनिशी बंद पाडू, असाही इशारा यावेळी डॉ. पाटील यांनी दिला. बैठकीच्या निमंत्रकपदी निवासराव साळोखे होते.राज्यात, महापालिकेत सत्तेत कोण आले, कोण येणार आहे याचे देणे-घेणे नाही, टोलविरोधात लढा प्रखरतेने उभा करण्यासाठी तारखा ठरवून नियोजन करणे गरजेचे असल्याचे मत डॉ. एन. डी. पाटील यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, तोंडावर दिवाळी असल्याने जनतेच्या मर्यादा ओळखून कृती समितीने लढ्याचे पाऊल उचलावे. शासनाकडे अर्ज करून प्रश्न सुटत नाहीत, त्यासाठी तीव्र लढ्याची आवश्यकता आहे. आपण शासनाशी चर्चेचे दरवाजे बंद केलेले नाहीत, पण याबाबत चर्चा करण्यासाठी राज्य शासनावर चळवळीच्या रेट्याची आवश्यकता आहे, त्यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे, असेही ते म्हणाले. गेल्या तीन महिन्यांसाठी टोलवसुलीला स्थगिती होती, आता स्थगितीची मुदत संपत आल्याने टोलनाक्यांची साफसफाई सुरू झाली आहे. त्यामुळे टोलनाके सुरू होण्याचे संकेत आहेत. टोलचा मुद्दा कायमचा हद्दपार करण्यासाठी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी दि. १६ नोव्हेंबरला सकाळी साडेदहा वाजता शिरोली टोलनाक्यावर एकत्र येऊन टोलवसुली सर्वशक्तीनिशी बंद पाडू. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, धरणे आंदोलने आदी पुढील टप्प्यातील आंदोलने करून तीव्रता वाढवू, असेही सांगितले. प्रारंभी निमंत्रक निवासराव साळोखे यांनी स्वागत, प्रास्ताविकपर भाषणात टोल आंदोलनाबाबत आढावा घेतला. सध्याचे आणि यापूर्वीचे सरकार टोल हद्दपार करण्याच्या थापा मारत असल्याचे सांगितले. टोल हद्दपार करण्यासंदर्भात जनतेचा रेटा लावणे गरजेचा असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, आर. के. पोवार, कॉ. चंद्रकांत यादव, जयकुमार शिंदे, माजी आमदार बजरंग देसाई, कॉ. दिलीप पवार, यूथ काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली पाटील आदींनी आपली भूमिका मांडून टोलला हद्दपार करण्यासाठी एकत्र ताकद लावू, असेही आवाहन केले. यावेळी बाबा पार्टे, करवीर पंचायत समिती सदस्य राजू सूर्यवंशी, बाबासाहेब पाटील-भुयेकर, अरुण चोपदार आदी उपस्थित होते.महापौर निवडीशी संबंध नाही१६ नोव्हेंबरला महापौर-उपमहापौर निवड असल्याची माहिती काहींनी यावेळी डॉ. पाटील यांना दिली; पण याचा आपल्याशी काहीही संबंध नाही. त्यावेळी पक्षांचे नेते आपल्या आंदोलनस्थळी येणार नाहीत असे समजू, पण हे आंदोलनाचे रणशिंग ताकदीने फुंकणार असल्याचा इशारा डॉ. पाटील यांनी यावेळी दिला. ...अन्यथा टोल नाक्यांवर पुन्हा धूरलोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुका झाल्या तरीही टोल काही हटला नाही. आता सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन टोलला कायमचे हटवावे, अन्यथा कोल्हापूरच्या जनतेशी बेईमानी केल्यासारखे होईल. पुन्हा टोल सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास नाक्यांवर पुन्हा धूर निघेल, असाही इशारा यावेळी बाबा इंदुलकर यांनी दिला. महापौर निवडीशी संबंध नाही१६ नोव्हेंबरला महापौर-उपमहापौर निवड असल्याची माहिती काहींनी यावेळी डॉ. पाटील यांना दिली; पण याचा आपल्याशी काहीही संबंध नाही. त्यावेळी पक्षांचे नेते आपल्या आंदोलनस्थळी येणार नाहीत असे समजू, पण हे आंदोलनाचे रणशिंग ताकदीने फुंकणार असल्याचा इशारा डॉ. पाटील यांनी यावेळी दिला. ...अन्यथा टोल नाक्यांवर पुन्हा धूरलोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुका झाल्या तरीही टोल काही हटला नाही. आता सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन टोलला कायमचे हटवावे, अन्यथा कोल्हापूरच्या जनतेशी बेईमानी केल्यासारखे होईल. पुन्हा टोल सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास नाक्यांवर पुन्हा धूर निघेल, असाही इशारा यावेळी बाबा इंदुलकर यांनी दिला.