शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खरा ‘टीआरपी’ पुन्हा गुलदस्त्यातच- : आॅनलाईन, अ‍ॅपवरील पे्रक्षक नोेंदीच्या कक्षेबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 11:54 IST

पॅकेजसह हे चॅनेल घेतल्यास ते स्वस्तात देण्यात आले. यामुळे बहुतांश ग्राहकांनी पॅकेजसह चॅनेल घेतली आहेत. यामध्ये ग्राहक सर्वाधिक चॅनल अथवा कोणती मालिका पाहतात, याची माहिती तंतोतंत उपलब्ध होत नाही. याचा परिणाम खरा ‘टीआरपी’ समजण्यावर झाला आहे

ठळक मुद्देस्वतंत्रऐवजी पॅकेजने चॅनल घेतल्याचा परिणाम पसंतीनुसार चॅनेल निवडीचा खेळ 

विनोद सावंतकोल्हापूर : ‘ट्राय’ने (टेलिव्हिजन रेग्युलेटरी आॅथॉरिटी आॅफ इंडिया) केबल ग्राहकांना पसंतीनुसार चॅनेल घेण्याची सुविधा केल्यामुळे चॅनेलचा खरा टीआरपी (टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट) समजेल, अशी अटकळ बांधली जात होती; परंतु चॅनेल कंपनीने कमी पसंतीच्या चॅनेलचे पितळ उघड होऊ नये यासाठी ग्राहकांना जादा पसंती असणारे चॅनेल स्वतंत्र घ्यावयाचे झाल्यास जादा दर लावले आहेत. याउलट पॅकेज घेतल्यास १५ ते २० चॅनेल स्वस्त देण्यात आली आहेत. यामुळे ग्राहकांनाही नाइलाजास्तव पॅकेज घेण्याची वेळ आली आहे. यामध्ये ग्राहक नेमके कोणते चॅनेल किती वेळ पाहतात, हे तपासणी करण्याची यंत्रणा सध्या तरी उपलब्ध नसल्यामुळे खरा टीआरपी पुन्हा गुलदस्त्यातच राहिला आहे.

टीआरपीवर चॅनेलचे महत्त्व, जाहिराती देण्याचा निर्णय होतो. ज्याचा जास्त टीआरपी, त्याला जाहिराती जास्त असा अलिखित नियमच बनला आहे. त्यामुळे चॅनेल कंपनीसाठी ‘टीआरपी’ हा विषय फार महत्त्वाचा आहे. टीआरपी ठरविण्यासाठी ठरावीक लोकांच्या घरांमध्ये टीव्हीसोबत टीआरपी मोजण्याचे मशीन ठेवले जाते. लोक कोणते चॅनेल, कोणती मालिका सर्वाधिक पाहतात याची नोंद होते; परंतु ठरावीक घरांमध्ये मशीन बसविल्याने यामधून खरा टीआरपी समोर येईल, याची खात्री नाही. ‘ट्राय’ने पसंतीनुसार चॅनेल निवडण्याची मुभा दिली; परंतु चॅनेल कंपनीने जास्त पाहिले जाणाऱ्या चॅनेलचे दर जादा केले. पॅकेजसह हे चॅनेल घेतल्यास ते स्वस्तात देण्यात आले. यामुळे बहुतांश ग्राहकांनी पॅकेजसह चॅनेल घेतली आहेत. यामध्ये ग्राहक सर्वाधिक चॅनल अथवा कोणती मालिका पाहतात, याची माहिती तंतोतंत उपलब्ध होत नाही. याचा परिणाम खरा ‘टीआरपी’ समजण्यावर झाला आहेहे केल्यास मिळेल ग्राहकांना न्यायसेटटॉप बॉक्सच्या माध्यमातून ग्राहकांना सर्वच चॅनेल उपलब्ध करून देण्यात आली पाहिजेत. यापैकी ग्राहक दिवसभरात कोणते चॅनेल किती वेळ पाहतो, त्यानुसार त्या चॅनेलच्या दरानुसार बिल आकारणी केल्यास खºया अर्थाने पसंतीनुसार चॅनेलची संकल्पना पूर्ण होईल. याचबरोबर चॅनेलचा खरा ‘टीआरपी’ही समोर येईल. मात्र, असे तंत्रज्ञान सध्या तरी उपलब्ध नसल्याची माहिती केबल सिस्टीम चालकांकडून येत आहे.सध्या बहुतांश नागरिकांचा कल डीटीएच, आॅनलाईन, मोबाईल कंपनीच्या माध्यमातून असणाºया लाईव्ह टीव्ही पाहण्याकडे वाढला आहे. याचबरोबर काही मोबाईल अ‍ॅपही चॅनलवरील मालिकांचे प्रक्षेपण करतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून टीव्हीवर झालेली मालिका अथवा खेळाचे सामने नंतर आपल्या सवडीने पाहता येतात. यावरील पे्रक्षकांची नोंद कुठेच होत नाही. हे ‘टीआरपी’च्या कक्षेत येत नाहीत, हेही वास्तव आहे. 

टॅग्स :MONEYपैसाbusinessव्यवसाय