कोल्हापूर : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात युवक काँग्रेसकडून काँग्रेस कमिटीसमोर गुरुवारी अभिनव आंदोलन करण्यात आले. दुचाकीला हार घालून, गुलाल, मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहण्यात आली.
पेट्रोल, डिझेल गॅसचे दर गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्य लोकांचे अतोनात हाल होत आहेत. याविरोधात युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. त्यांनी दुचाकी वाहनाला श्रद्धांजली वाहून केंद्र सरकारचा निषेध केला.
यावेळी कोल्हापूर युवक काँग्रेस अध्यक्ष दीपक थोरात, इंद्रजित साळुंखे, विनायक पाटील, अभिषेक मिठारी, उदय पोवार, ऋषिकेश पाटील, अक्षय शेळके, मकरंद कवठेकर, आनंदा करपे, प्रशांत गणेशाचार्य, अनिकेत कांबळे, सचिन लोंढे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो : १८०२२०२१ कोल काँग्रेस आंदोलन न्यूज
कोल्हापूर : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात युवक काँग्रेसकडून काँग्रेस कमिटीसमोर गुरुवारी दुचाकीला श्रद्धांजली वाहून अभिनव आंदोलन केले.