कोल्हापूर : वसुंधरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने जागतिक सायकलपटू श्रीरंग धर्मा घोसरवाडकर व सीताबाई रामचंद्र गुरव (मिरजोळे, जि. रत्नागिरी) यांच्या स्मृतीपित्यर्थ गांधीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. करवीर पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्या हस्ते हे वृक्षारोपण केले. यावेळी गांधीनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दीपक भांडवलकर हे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक अतुल कदम, सुवर्णा कोडोलीकर, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष भानुदास भोसले, संग्राम चांदेकर, अविनाश कांबळे, रणजीत कांबळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमाकांत काकडे यांनी केले. तर उपाध्यक्ष प्रा. आप्पासाहेब चव्हाण यांनी आभार मानले.
फोटो नं. १४०८२०२१-कोल-गांधीनगर पोलीस
ओळ : वसुंधरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने गांधीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक दीपक भांडवलकर, अतुल कदम आदी उपस्थित होते.