शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

सीपीआरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ट्रामा केअर सेंटर

By admin | Updated: March 11, 2017 00:32 IST

रामानंद यांची माहिती : उच्च दर्जाची यंत्रे, सुसज्ज व्यवस्थेसह न्यूरो सर्जनचीही नियुक्ती करण्यात येणार

कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात ट्रामा केअर सेंटर प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले आहे. उच्च दर्जाची यंत्रे आणि सुसज्ज व्यवस्था या सेंटरमध्ये असून लवकरच न्यूरोसर्जन याठिकाणी नियुक्त करणार असल्याची माहिती राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.रामानंद म्हणाले, सीपीआरमध्ये ट्रामा केअर सेंटरच्या बांधकामासाठी राज्य शासनाने ८० लाख रुपये उपलब्ध करून दिले. यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, अमल महाडिक आदींनी प्रयत्न केले. आता एक महिना हे सेंटर प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर कायमस्वरूपी सुरू राहील. या सेंटरमध्ये २० बेडची (कॉट) व्यवस्था असून दहा बेड हे अतिदक्षता विभागासाठी तसेच स्त्री व पुरुष विभागात प्रत्येकी पाच असे एकूण दहा बेड आहेत. त्याचबरोबर अत्याधुनिक पद्धतीचा शस्त्रक्रिया विभाग (आॅपरेशन थिएटर) करण्यात आला आहे. खासगी रुग्णालयांच्या मानाने सीपीआरमध्ये रुग्णांना चांगल्या सुविधा मिळणार आहेत. नऊ सर्जन, आठ वैद्यकीय अधिकारी, २० नर्सेस असे मनुष्यबळ या विभागासाठी कार्यरत आहे तसेच न्यूरोसर्जनसाठी बंगलोर येथील अनिल जाधव यांनी अर्ज केला असल्याचे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी सांगितले. यावेळी डॉ.व्ही. ए. देशमुख, डॉ. मिसाळ, अभ्यागत समितीचे महेश जाधव, सुनील करंबे, डॉ. अजित लोकरे, डॉ. सुरेखा बसरगे, डॉ. इंद्रजित काटकर आदी उपस्थित होते. अतिक्रमण १५ दिवसांत काढणार...सीपीआरच्या आवारात चहाच्या टपऱ्या, खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत. त्यामुळे आवारात अतिक्रमण वाढले आहे. सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून संबधितांना अंतिम नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढील १५ दिवसांत येथील पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटविले जाईल, असे अधिष्ठाता डॉ.रामानंद यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.न्यूरोसर्जनची नियुक्ती करा : क्षीरसागरसीपीआरमधील ट्रामा केअर सेंटरमध्ये तत्काळ न्यूरोसर्जनची पदनिर्मिती करून नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्याकडे अर्थसंकल्पीय अधिवेशनात निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे पत्रक क्षीरसागर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.