शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धैर्यशील माने यांनी फुंकले लोकसभेसाठी रणशिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:40 IST

कोल्हापूर : हातकणंगले मतदारसंघातून २०१९ ला होणारी लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याची घोषणा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी बुधवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्दे झेंड्याचा निर्णय योग्य वेळी : बहुजन समाजाची मोट बांधण्याचा निर्धार; शेतकरी संघटना राजकीय झाल्याचीही टीका सत्तेभोवतीचे राजकारण सामान्य माणसाने ओळखले आहे.शेतकºयांनी टाकलेल्या विश्वासास शेट्टी यांच्या भूमिकेने तडा गेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : हातकणंगले मतदारसंघातून २०१९ ला होणारी लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याची घोषणा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी बुधवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केली. कोणत्या पक्षातून लढायचे हा निर्णय योग्य वेळी घेऊ. केवळ विरोधाला विरोध म्हणून नव्हे तर सर्व विचारांच्या लोकांना एकत्रित करीत बहुजन समाजाची मोट बांधणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

स्वर्गीय बाळासाहेब माने यांनी लोकसभेच्या पाच निवडणुका जिंकल्या. निवेदिता माने यांनीही पाचपैकी दोन निवडणुका जिंकल्या आहेत. त्यामुळे माने कुटुंबाला दीर्घ सामाजिक व राजकीय इतिहास आहे; पण २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षनेतृत्वाने आमच्या हातातून मतदारसंघ काढून घेऊन तो कॉँग्रेसला दिल्याने थांबावे लागले. लढाई थांबली की कार्यकर्ता थांबतो; त्यामुळे गेले अनेक दिवस माने यांनी पन्हाळा-शाहूवाडीपासून शिरोळपर्यंतच्या माने गटाच्या जुन्या-नव्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून, माजी खासदार निवेदिता माने यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाबाबत ‘वेट अ‍ॅँड वॉच’ची भूमिका असून आज, गुरुवारपासूनच मतदारसंघातील वाड्यावस्त्या पिंजून काढण्यास सुरुवात करणार आहे. आमचे कार्यकर्ते सर्व पक्षांत विखुरलेले आहेत. त्यांना सोबत घेऊन गटाची पुनर्बांधणी करावी लागणार असल्याचे माने यांनी सांगितले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर टीका करताना माने म्हणाले, केंद्र व राज्यात भाजपला सोडचिठ्ठी दिली; पण जिल्हा परिषदेतील प्रेम मात्र कायम आहे. गेल्या वेळेलाही केंद्र व राज्यात कॉँग्रेसविरोधात पण जिल्हा परिषदेत त्यांच्यासोबत सत्तेत राहिले. त्यांचे सत्तेभोवतीचे राजकारण सामान्य माणसाने ओळखले आहे. संघटनेतून शेतकरी बाजूला पडला असून शेतकरी संघटना ‘राजकीय’ झाल्याची टीका माने यांनी केली.माने गट अद्याप राष्टÑवादीतचअद्याप आम्ही राष्टÑवादी सोडलेली नाही. पक्षाचा अक्रियाशील सदस्य असून वहिनीसाहेब मात्र क्रियाशील आहेत; पण पक्षाने आमचे प्ले-ग्राउंडच काढून घेतले. कॉँग्रेसला मतदारसंघ दिल्याने आम्हाला सावध भूमिका घ्यावी लागत आहे. संघर्ष आमच्या पाचवीला पुजलेला आहे, आतापर्यंत आम्ही लढा उभा केला म्हणूनच तरल्याचे माने यांनी सांगितले. 

शेट्टी बहुजन समाजाविरोधातराजू शेट्टी यांचे राजकारण हे बहुजन समाजाविरोधात असल्याचा कदाचित कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना अनुभव आला असेल. प्रश्न संपला की शेट्टींचे राजकारण संपले; त्यामुळे ते प्रश्न जिवंत ठेवण्यासाठी आंदोलन करतात, हे आता लोकांच्या लक्षात आले असून शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, बारा बुलतेदारांसह बहुजन समाजाला बरोबर घेऊन आपण लढाई करणार असल्याचे माने यांनी सांगितले.भाऊंच्या पक्षविरहित संघटनेला पाठिंबाबहुजन समाजातील म्हणून सदाभाऊंचे खच्चीकरण करण्याचे काम राजू शेट्टी यांनी केले. त्यामुळे खोत यांनी यापूर्वीच हा निर्णय घेणे गरजेचे होते. शेतकºयांनी टाकलेल्या विश्वासास शेट्टी यांच्या भूमिकेने तडा गेला आहे. सदाभाऊंनी पक्षविरहित संघटना काढली तर तिला आमचा पाठिंंबा राहणार असून, शेतकºयांच्या प्रश्नांचा कोणा एकट्याला मक्ता दिला नसल्याचा टोलाही माने यांनी लगावला.संभाजीराजे माझे मार्गदर्शकखासदार संभाजीराजे यांच्याशी आमचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आमची वाटचाल सुरू असून, त्यांचा आशीर्वाद घेऊन पाऊल टाकणार असल्याचे माने यांनी सांगितले.