शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीमुळे कर आकारणीत पारदर्शीपणा

By admin | Updated: March 23, 2017 00:33 IST

के. के. श्रीवास्तव : सेंट्रल एक्साईज व सेवाकर खात्यातर्फे जीएसटी मार्गदर्शन कार्यशाळा

कोल्हापूर : आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण तसेच संपूर्ण देशात एकसारखी कर व्यवस्था अस्तित्वात आल्याने कर आकारणीत पारदर्शीपणा येणार आहे. तरी व्यापारी, उत्पादक, उद्योजकांनी जीएसटी करप्रणालीत नोंदणी करून सहकार्य करावे, असे आवाहन कोल्हापूर आयुक्तालयाचे अतिरिक्त आयुक्त के. के. श्रीवास्तव यांनी बुधवारी केले.येथील सेंट्रल एक्साईज व सेवाकर विभागातर्फे जीएसटी मार्गदर्शन कार्यशाळा झाली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहआयुक्त धर्मेंद्र प्रताप सिंग, सहायक आयुक्त चंद्रकांत केदार उपस्थित होते. श्रीवास्तव म्हणाले, जीएसटी अर्थात वस्तू व सेवाकर दि. १ जुलैपासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे कर आकारणीत सुटसुटीतपणा येऊन देशभरात एकच करप्रणाली अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे देशांतर्गत उत्पादनवाढीस चालना मिळेल. उत्पादन ते ग्राहकांच्या हाती पोहोचेपर्यंत टप्प्या-टप्प्यांवर गोळा करण्याच्या क्लिष्ट पद्धतीपेक्षा ही पद्धत सुटसुटीत होऊन जाईल तसेच सर्व उत्पादनांचे विक्रीमूल्य सारखे बनून संपूर्ण देशच एक मोठी बाजारपेठ म्हणून समोर येणार आहे.या करप्रणालीमुळे ग्राहक, उत्पादन, व्यवसायासह सामान्य माणसांचाही फायदा होणार आहे. करांचा बोजा कमी झाल्याने उत्पादनांचा दर्जा व गुणवत्तेत सुधार होईल. जीएसटीमुळे जीडीपीमध्ये दोन टक्क्यांनी वाढ होईल, असा जागतिक बँकेचा अंदाज आहे. सहआयुक्त सिंग म्हणाले, सोळा कर एकत्रित असलेल्या जीएसटीमुळे कर आकारणी प्रणालीत सोपेपणा येणार आहे. सर्व प्रक्रिया आॅनलाईन होणार असल्याने कररचना पद्धत पारदर्शी होईल तसेच करचुकवेगिरीस आळा बसणार आहे. सरकारचे उत्पन्न वाढल्याने सामाजिक सुरक्षा, मूलभूत सोयी-सुविधांच्या उभारणीत सरकारला अधिक निधी उपलब्ध होणार आहे तरी व्यापारी व उद्योजकांनी जीएसटी करप्रणालीत नोंदणी करून त्यामध्ये सहभागी व्हावे. सहायक आयुक्त दुर्गेश साळुंखे यांनी जीएसटी मायग्रेशन व आॅथराईज्ड इकॉनॉमिक आॅपरेटर याविषयी मार्गदर्शन करत नोंदणी प्रक्रियेविषयी शंकांचे निरसन केले. यावेळी व्यापारी, उत्पादक, सराफ बिल्डर्स, सीए असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. नोंदणीसाठी : महत्त्वाच्या गोष्टीजीएसटी करप्रणालीत नोंदणीसाठी व्यापारी, उत्पादकांची किमान उलाढाल वीस लाख रुपये असावी. ६६६.ॅ२३.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर आॅनलाईन नोंदणीसाठी अर्ज करताना पॅनकार्ड, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडीसोबत असावा. प्राथमिक माहिती भरल्यानंतर पॅनकार्डची सत्यता पडताळून पाहिली जाईल व प्रोव्हिजनल आयडी व पासवर्ड दिला जाईल.त्यानंतर आपल्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार आवश्यक ती कागदपत्रे सेंट्रल एक्साईज व सेवाकर खात्याच्या कार्यालयात जमा करावी लागतील. अधिक माहितीसाठी व मदतीसाठी कसबा बावडा मार्गावरील विक्रीकर भवनमधील वस्तू व सेवाकर मदत कक्षाशी संपर्क साधावा.