शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’साठी लोकसभेची रंगीत तालीम

By admin | Updated: February 14, 2017 00:07 IST

शिरोळ राखण्याचे आव्हान : कुणाचा ‘हात’ हातात घेणार हीच उत्सुकता; मित्रपक्ष भाजपसोबत दरी वाढली

विश्वास पाटील ल्ल कोल्हापूरस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यादृष्टीने यंदाची जिल्हा परिषद निवडणूकही लोकसभेची रंगीत तालीमच आहे. कारण संघटना निकालानंतर काय भूमिका घेते, यावर भाजपची रणनीती ठरणार आहे. ‘स्वाभिमानी’ने त्यांचे सध्याचे आहे ते संख्याबळ राखून सत्ता समीकरणात काँग्रेसला साथ केली, तर पुढच्या लोकसभेला खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार असणार हे नक्की. आता तरी भाजपकडून शिरोळ तालुक्यात ज्या पद्धतीने मोर्चेबांधणी केली जात आहे, अगदी ग्रामपंचायत समितीच्या सदस्यालाही फोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ते पाहता संघटना व भाजपमधील दरी रुंदावण्याचीच शक्यता ठळक आहे. खरंतर स्वाभिमानी संघटना हा भाजपचा राज्याच्या राजकारणातील शिवसेने इतकाच विश्वासू मित्रपक्ष. दोन्ही काँग्रेसच्या त्यातही राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात राळ उठविण्याचे काम मुख्यत: संघटनेने केले. त्याचा फायदा भाजपला लोकसभा व विधानसभेलाही झाला; परंतु आता भाजपला स्वबळावर सगळे राजकारण करायचे आहे. त्यात खासदार राजू शेट्टी यांनी भाजप सरकारने मुंबईत शिवस्मारकाच्या भूमिपूजनाच्या समारंभास निमंत्रित केले नसल्याच्या रागातून भाजपवर बोचरी टीका केली.भाजप आता शिवाजी महाराजांच्या प्रेमात पडले आहे; परंतु जेम्स लेनच्या प्रकरणात भाजप कुठे होता, अशी विचारणा केल्यावर भाजपचीही पंचाईत झाली. तेथून संघटना व भाजपमधील दरी रुंदावली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हे दोन पक्ष एकत्र येणार नाही हे स्पष्टच होते. फक्त एकत्र येण्याच्यादृष्टीने वरकरणी बैठक झाली; परंतु पुढे काहीच घडले नाही. आता स्वाभिमानी जिल्हा परिषदेच्या २३ व पंचायत समितीच्या ४५ जागा लढवित आहे. त्यातही शिरोळ, हातकणंगले व पन्हाळा तालुक्यांत संघटनेने जास्त ताकद लावली आहे. गेल्या निवडणुकीत संघटनेच्या सर्व पाच जागा शिरोळ तालुक्यातून विजयी झाल्या व शिरोळमधील एक व हातकणंगले तालुक्यातील रुकडी मतदारसंघात त्यांचा उमेदवार कमी मतांनी पराभूत झाला होता. यावेळेला त्यांना त्यांचे होमपिच असलेल्या शिरोळमधूनच जास्त कडवे आव्हान आहे. शेट्टी यांच्या राजकारणावर जातीय आरोप होतो. विधानसभेलाही त्याचे प्रत्यंतर आले. त्यामुळे संघटनेने या निवडणुकीत सर्व जाती-धर्मातील सक्षम उमेदवारांना संधी दिली आहे. संघटनेकडे आता शिरोळ पंचायत समितीची सत्ता आहे. जयसिंगपूर नगरपालिकेतही पक्षाने अस्तित्व दाखवून दिले आहे. त्यामुळे संघटना शिरोळ हा त्यांचा गड किती भक्कमपणे राखते, हीच खरी उत्सुकता आहे.ऊसदराला संघटना.. मताला मात्र दुसरे..संघटनेचा कार्यकर्ता लढाऊ असला तरी तो फाटका आहे. निवडणुकीच्या रणांगणातील इतर साधनसामग्रीत तो बराच मागे पडतो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संघटनेच्या यशाला कायमच मर्यादा पडल्या आहेत. या निवडणुकीतही यापेक्षा वेगळे चित्र नाही. लोकांनाही ऊसदराच्या आंदोलनात संघटनेचा बिल्ला आधार वाटतो; परंतु निवडणुकीत मात्र ते पुन्हा अन्य झेंड्यांच्या म्हणजेच प्रस्थापित पक्षांच्या वळचणीला जातात, असा अनुभव कायमच येतो. जालंदर मागे.. जनार्दन पाटील पुढे..स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेले प्रा. डॉ. जालंदर पाटील हे राशिवडे मतदारसंघातून ही निवडणूक लढवित होते; परंतूुत्यांनी सोमवारी ऐनवेळी माघार घेतली. परिते मतदारसंघातून संघटनेतर्फे जनार्दन पाटील (रा. परिते) हे रिंगणात आहेत. भोगावती परिसराचे ते संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासारख्या लढाऊ कार्यकर्त्याला संधी द्यायची आणि सगळी ताकद तिथेच लावली जावी यासाठी आपण माघार घेतल्याचे जालंदर पाटील यांचे म्हणणे आहे.स्वाभिमानी या निवडणुकीत लढत असलेल्या जागा जिल्हा परिषद २३ आणि पंचायत समिती : ४५जिल्हा परिषदेचे तालुकानिहाय उमेदवार : शिरोळ-०७, हातकणंगले-०६, पन्हाळा-०४, राधानगरी आणि शाहूवाडी प्रत्येकी-०२ आणि करवीर व भुदरगड प्रत्येकी-०१.पाच तालुक्यांत उमेदवार नाहीसंघटना सात तालुक्यांत लढत आहे व पाच तालुक्यांत त्यांचा एकही उमेदवार रिंगणात नाही. चंदगड विधानसभा मतदारसंघात ‘स्वाभिमानी’ने स्थानिक आघाडी केली आहे; परंतु हा पक्ष तिथे पाच पंचायत समित्या फक्त लढवित आहे. जिल्हा परिषदेची एकही जागा लढवित नाही. निकालानंतर सत्त्वपरीक्षा..स्वाभिमानीने गत सभागृहातील पाच हे संख्याबळ राखले आणि भाजपला सत्ता खेचण्यासाठी संघटनेची गरज लागली तर शेट्टी काय करणार हीच खरी सत्त्वपरीक्षा असेल. सध्या भाजपच्या कोट्यातून विधान परिषदेवर गेलेले सदाभाऊ खोत कृषी राज्यमंत्री आहेत. त्यामुळे संघटनेवरही निकालानंतर पाठिंब्यासाठी मोठा दबाव येऊ शकतो. संघटना आता तरी जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसशी मिळते-जुळते घेण्याच्या मनस्थितीत आहे. मावळत्या सभागृहातही एकदाच सुरुवातीला काँग्रेसशी त्यांची आघाडी झाल्यावर पाच वर्षांसाठी महत्त्वाचे बांधकाम सभापतिपद संघटनेला देण्यात आले. पुन्हा या आघाडीबाबत कधीच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले नाही. भले लोकसभेला शेट्टी यांच्या विरोधात काँग्रेसकडून कल्लाप्पाण्णा आवाडे रिंगणात उतरले तरी..! त्यामुळे मित्रपक्ष म्हणून तोंडावर हात फिरवून प्रत्यक्षात कुरघोडीचे राजकारण करणाऱ्या पक्षापेक्षा काँग्रेसच बरी, अशी प्रतिक्रिया संघटनेचे कार्यकर्तेही आता उघडपणे बोलून दाखवू लागले आहेत.