शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

म्हशी, रेडकांना स्पर्धेसाठी सहा महिने अगोदर ट्रेनिंग, डायट प्लॅनही

By सचिन यादव | Updated: January 11, 2025 16:40 IST

सचिन यादव कोल्हापूर : राजेशाही शौक कोल्हापुरातल्या रहिवाशांनी मनापासून जपले. हत्तीची साठमारी, कोंबड्याच्या झुंजी, रेड्यांच्या टकरा, म्हशींच्या शर्यती याबरोबरच ...

सचिन यादवकोल्हापूर : राजेशाही शौक कोल्हापुरातल्या रहिवाशांनी मनापासून जपले. हत्तीची साठमारी, कोंबड्याच्या झुंजी, रेड्यांच्या टकरा, म्हशींच्या शर्यती याबरोबरच अनेक मैदानी, मर्दानी खेळ जोपासले. त्याकाळी म्हशींच्या शर्यती हा प्रकार जन्माला आला. तो आजतागायत सुरू आहे. दिवाळी पाडव्यापासून सुरू होत असलेल्या स्पर्धा मे महिन्यापर्यंत घेतल्या जातात. त्याची तयारी सहा महिने आधी केली जात असून, लाखांची बक्षिसे स्पर्धेसाठी आहेत. जिल्ह्यातील हजारांहून अधिक म्हैस मालक यामध्ये सहभागी होतात. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांत या स्पर्धा लोकप्रिय ठरल्या आहेत.स्पर्धेत रेडकू आणि म्हशी उतरविण्यासाठी सहा महिने आधी तयारी केली जाते. उच्चतम, मध्यम आणि सर्वसामान्य अशी तीन गटांत स्पर्धेचे वर्गीकरण केले जाते. सहा महिने ते सुमारे तीन वर्षे वय असलेले रेडूक आणि म्हैशी स्पर्धेत सहभाग घेतात. रेडकूसाठी एक किलोमीटर आणि म्हशीसाठी दोन किलोमीटर अंतराच्या स्पर्धा घेतल्या जातात. बाइकच्या पाठीमागून म्हशी पळविण्याचा थराराने आणि एकमेकांना ओव्हरटेक करणाऱ्या म्हशी आणि बाइकचे ब्रेक थांबल्यावर जागेवर थांबून झपकन वळणाऱ्या म्हशींची थरारक कसरत पाहण्यासारखी असते.रोज त्यांना ट्रॅकवर चालविणे, पाण्यात पोहणे, लाल कापड समोर धरून दुचाकीच्या मागे धावणे, मालकाच्या आवाजाची सवय केली जाते. त्यासह त्यांचा रोजचा `डाएट प्लॅन`ही ठरलेला आहे. दर्जेदार खुराक, रोज तीन ते सहा लिटर दूध, पेंड, भुसासह त्यांची आठवड्यातून एकदा आरोग्य तपासणी केली जाते. स्पर्धेच्या पूर्वी त्यांना योग्य तो आरामही दिला जातो. तीन हाकेत म्हैस बोलविण्यासाठी मालकाला खूप सराव करावा लागतो. खुर्चीवर उभे राहून अनेकदा पहिल्या हाकेतच म्हैस मालकाजवळ पोहोचते, हे एक वेगळेच कौशल्य असते.

स्पर्धेची व्याप्ती सध्या वाढली असून, टेम्पोमधून म्हशी नेल्या जाऊ लागल्या आहेत. म्हशींच्या शर्यतीमुळे महाराष्ट्रात कोल्हापूरची एक वेगळी ओळख तयार झाली. महाराष्ट्र आणि कर्नाटकात या स्पर्धा होत असून, दोन लाखांपर्यंतची बक्षिसे संयोजकांकडून दिली जात आहेत.

अनेक कुटुंबांचा भागराजर्षी शाहू महाराज, राजाराम महाराज यांच्या काळात कणेरी मठ, उजळाईवाडी येथे मोठे गोठे होते. दिवस-रात्र केले जाणारे वैरणपाणी, सततचा सहवास यामुळे जनावरांनासुद्धा माणसांचा लळा लागतो. अनेक कुटुंबांचाच हा एक भाग बनला आहे.

स्पर्धेच्या प्रकारात बदलकाळानुरूप स्पर्धेच्या प्रकारात बदल झाला. त्या काळात एकदम सगळ्या म्हशी मालकांच्या पाठीमागे पळण्याची स्पर्धा होती. सर्वांत प्रथम येणारी म्हैस विजेती होत असे. याप्रमाणे क्रमांक ठरविले जात होते. त्यावेळी गवताच्या जाळावरून म्हैस उडी मारून पळविण्याचे, तसेच लपून म्हशीला बोलाविणे, दोन पायांवर बसणे, चौरंगावर बसणे असे कसरतीचे प्रयोग केले जायचे. सध्या दुचाकीमागून म्हैस पळविणे, दूर अंतरावरून तीन हाकेत म्हैस बोलाविणे, असे प्रकार रुजले. स्टॉप वॉचच्या साहाय्याने वेळ मोजून कमीत कमी वेळ हा क्रमांकासाठी निकष ठरविला.

माणूस आणि जनावरे यांच्यातील प्रेम वेगळे असते. परस्परांवर अवलंबून असलेले अवलंबित्व आणि गरज म्हणून जनावरे आणि मालकांचे ऋनानुबंध अधिक घट्ट होतात. दुचाकीच्या हॉर्नच्या इशाऱ्यावर कै. मनोहर पाटील यांनी सन १९५९ मध्ये म्हैस जवळ बोलावून दाखविली. त्यानंतर हा प्रकार जिल्ह्यात रूढ झाला. - राजू पाटील, बुधवार पेठ, संचालक कोल्हापूर जिल्हा म्हैस धारक असोसिएशन

टॅग्स :kolhapurकोल्हापूर