शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर  शहरात ट्रॅफिक ड्राईव्ह : ९०० वाहनचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 11:52 IST

कोल्हापूर शहरातील महाविद्यालय परिसरासह चौकांत, नाक्यांवर व महामार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवून वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेमध्ये सुमारे ९०० नियमबाह्य वाहनचालकांवर कारवाई करत, १ लाख ८० हजार रुपये दंडाची वसुली केली.

ठळक मुद्देकोल्हापूर शहरात ट्रॅफिक ड्राईव्ह ९०० वाहनचालकांवर कारवाई वाहनचालकांची तारांबळ

कोल्हापूर : शहरात घरफोड्या, चेन स्नॅचिंग, लूटमारीसह मोटारसायकल चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे, तसेच अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी नऊ ते दुपारी एक व सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत शहरातील महाविद्यालय परिसरासह चौकांत, नाक्यांवर व महामार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवून वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेमध्ये सुमारे ९०० नियमबाह्य वाहनचालकांवर कारवाई करत, १ लाख ८० हजार रुपये दंडाची वसुली केली.घरफोड्या, चेन स्नॅचिंग, लूटमारीसह दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी ‘ट्रॅफिक ड्राईव्ह’ घेण्याचे आदेश शहरातील पाचही पोलीस ठाण्यांसह शहर वाहतूक शाखेस दिले. त्यानुसार शहरातील पाच पोलीस निरीक्षक, १०० पोलीस कर्मचाऱ्यांची फौज मंगळवारी रस्त्यावर उतरली.

सकाळी नऊ ते दुपारी एक व सायंकाळी सहा ते रात्री आठ या कालावधीत शिवाजी पूल, दसरा चौक, लिशा हॉटेल चौक, सदर बझार, ताराराणी पुतळा, महावीर कॉलेज चौक, मध्यवर्ती बसस्थानक, सायबर चौक, लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर, गंगावेश, सायबर चौक, जवाहरनगर, फुलेवाडी नाका, कळंबा नाका, वाशी नाका, आर. के. नगर, आदी १५ ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवत प्रत्येक व्यक्तीची, वाहनांची व साहित्याची कसून तपासणी केली.

वाहनांतील गॅसकिटच्या तपासणीसह परवाना, वाहनांची कागदपत्रे,तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांची ब्रेथ अ‍ॅनालायझर यंत्राद्वारे तपासणी केली.झेब्रा क्रॉसिंगवर, स्टॉप लाईनवर वाहन उभे करणे, डावी लेन मोकळी न ठेवणे, सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन करणे, एकेरी मार्गावर वाहन चालविणे, तिब्बल सीट यासह अन्य फॅशनेबल नंबरप्लेट वाहनांवर लावून फिरणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक अनिल गुजर, वसंत बाबर, संजय मोरे, मानसिंह खोचे, औदुंबर पाटील यांनी स्वत: रस्त्यावर उभे राहून वाहनांची तपासणी केली.

वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करू नये, सोबत योग्य ती कागदपत्रे बाळगावीत व कायदेशीर कारवाई टाळावी.अनिल गुजर, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा. 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसkolhapurकोल्हापूर