लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कोरोना संसर्गामुळे गतवर्षीपासून लॉकडाऊन व संचारबंदीमुळे व्यवसाय करण्यास अनेक अडचणी येत असल्याने व्यापारी आर्थिक संकटात सापडला आहे. व्यापाºयांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता शासनाने सर्वतोपरी विचार करून त्वरित निर्बंध शिथिल करावे. त्यामुळे व्यापा-यांना दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अॅड. अनिल डाळ्या यांनी केली आहे.
कोरोना प्रादुभार्वामुळे इचलकरंजीत गेल्या ९० दिवसांपासून अत्यावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापना बंद असल्याने व्यापा-यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव घटत असतानाही प्रशासन लॉकडाऊनचे नियम शिथिल करत नाही. कोरोनाची रुग्णसंख्या ही केवळ व्यापारीवर्गामुळे वाढलेली नाही. त्यामुळे व्यापा-यांच्या मागणीचा प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी डाळ्या यांनी केली आहे.