शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
3
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
4
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
5
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
6
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
9
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
10
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
11
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
12
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
13
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
14
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
16
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
17
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
18
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
19
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
20
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी

उद्या ‘रंगबहार’तर्फे ‘मैफल रंगसुरांची’

By admin | Updated: January 17, 2015 00:34 IST

टाऊन हॉलमध्ये आयोजन : वीस कलाकार; बी. आर. टोपकरांना ‘रंगबहार जीवनगौरव’ने सन्मानित करणार

कोल्हापूर : कलातपस्वी आबालाल रेहमान आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या स्मृतिनिमित्त ‘रंगबहार’ संस्थेतर्फे रविवारी (दि. १८) ‘मैफल रंगसुरांची’ कार्यक्रम होणार आहे. येथील टाऊन हॉल उद्यान येथे सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत चित्रकार-शिल्पकारांच्या कलाकृती, शास्त्रीय गायन आणि सतारीच्या सुरांची मैफल रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. यामध्ये वीस कलाकार सहभागी होणार आहेत. यावेळी खासदार धनंजय महाडिक प्रमुख उपस्थित असतील. कलाकार बी. आर. टोपकर यांना ‘रंगबहार जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. शून्यातून शिखर गाठलेला कलाकार...कोल्हापूर : शांत स्वभाव, पण मनमोकळं बोलणं, सभ्यता सोबत कष्ट करण्याची प्रचंड जिद्द, हार न मानता परिस्थितीशी झगडत नशीब बदलणं हे सगळं माझ्या आजोबांना अवगत आहे. आण्णांचा जन्म कलेसाठी झाला आणि कलाकार म्हणूनच ते जन्माला आले. कला ही देवाची देणगीच आहे. ते लहान वयातही शाळेत शिक्षकांकडून सुंदर चित्र रेखाटून कौतुक करून घ्यायचे. आत्मविश्वासाच्या जोरावर कलेची वाट धरण्याचा त्यांचा निर्णय तसा टोपकर घराण्यात नवीनच होता. स्वत:वर आणि कलेवर दृढ श्रद्धा ठेवून त्यांनी चित्रकलेचे शिक्षण घेतले. शून्यातून यशाचे शिखर गाठताना दत्तोबा दळवींसारखे दिग्गज गुरू, ठाकूर आणि महाजनींसारखे गुरुबंधू त्यांना मिळाले. इम्प्रेशननिस्ट आर्ट शैली जोपासताना आण्णांनी टाईम स्केचेस, व्यक्तिचित्रे, लँडस्केप आणि म्युरल्स यांवरही मास्टरी मिळवली. त्यांची आणखी एक खुबी म्हणजे काष्ठशिल्पकला. १९५१ मध्ये पुण्यात प्रथम हालत्या चित्रांचे प्रदर्शन सादर करून ते हालत्या चित्रांचे जनक बनले. त्यात आण्णांनी महात्मा गांधी, झाशीची राणी, छ. शाहू महाराज, छ. शिवाजी महाराज, यांचे चरित्र तसेच भारताचा विकास हा विषय मांडून समाजप्रबोधन कार्यास हातभार लावला. जीवनात जितकी कलेची साथ होती, तितकाच अ‍ॅलर्जीचा अडथळाही होता; पण त्यांनी कधीही माघार घेतली नाही. ५० वर्षे अ‍ॅलर्जीशी झगडून त्यांनी जिवंत रंगांनी सजवले, शिल्पांनी बहरले आणि हालत्या चित्रांनी परिपूर्ण केले.- ऋग्वेदा टोपकर (कोल्हापूर)