शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

टोलची अंतिम सुनावणी सुरू

By admin | Updated: September 30, 2014 01:04 IST

आज निकाल शक्य : दोन्ही याचिकाकर्त्यांचे म्हणणे सादर; कोल्हापूरकरांचे निकालाकडे लक्ष

कोल्हापूर : कोल्हापूरच्या टोलप्रश्नी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या तीन याचिकांवर आज, सोमवारपासून अंतिम सुनावणी सुरू झाली. दुपारी एक वाजल्यापासून सायंकाळी न्यायालयाचा वेळ संपेपर्यंत अ‍ॅड. युवराज नरवणकर व अ‍ॅड. अभय नेवगी यांनी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. सी. धर्माधिकारी व ए. के. मेनन यांच्या खंडपीठापुढे म्हणणे मांडले. उद्या, मंगळवारी सकाळी अकरा वाजता पुन्हा सुनावणी सुरू होणार आहे. न्यायिक स्तरावरील ही टोलबाबतची अंतिम सुनावणी असल्याने कोल्हापूरकरांचे लक्ष निकालाकडे लागून राहिले आहे. ‘टोल रद्द’च्या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीतर्फे किरण पवार, चंद्रमोहन पाटील, सुभाष वाणी, शिवाजीराव परुळेकर व अमर नाईक यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. या सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने आजपासून अंतिम सुनावणी सुरू झाली. न्यायालयाच्या पहिल्या सत्रात एक वाजल्यापासून अडीच वाजेपर्यंत शहर एकात्मिक रस्ते प्रकल्पात अनेक त्रुटी आहेत, ९५ टक्के काम झालेले नाही, त्यामुळे ही बेकायदेशीर टोलवसुली रद्द करावी, अशी मागणी कृती समितीचे अ‍ॅड. नरवणकर यांनी केली. रस्ते प्रकल्पात ७० टक्क्यांपेक्षा कमी कामे झाली आहेत. युटिलिटी शिफ्टिंगचा मुद्दा प्रलंबित आहे. केलेल्या रस्त्यांच्या कामाला दर्जा नाही. तोडलेली वृक्षलागवडही केलेली नाही. प्रकल्पाच्या करारातील अटी व शर्थींचा ‘आयआरबी’ने केलेला भंग केला आहे, आदीं मुद्द्यांवर दुपारनंतर न्यायालयाचा वेळ संपेपर्यंत अ‍ॅड.अभय नेवगी यांनी पुराव्यांसह म्हणणे सादर केले, अशी माहिती याचिकाकर्ते सुभाष वाणी यांनी ‘लोकमत’ला दिली. उद्या सकाळी महापालिकातर्फे युटिलिटी शिफ्ंिटगबाबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रासह अ‍ॅड. जमशेट कामा हे बाजू मांडणार आहेत. त्यानंतर ‘आयआरबी’चे म्हणणे ऐकू न घेत न्यायालय अंतिम निकाल देण्याची शक्यता आहे. ‘सर्वाेच्च आदेश’ मुंबई उच्च न्यायालयाने २१ एप्रिल २०१४ रोजी दिलेल्या निकालात कोल्हापूर शहरातील टोलवसुलीच्या स्थगितीचा अंतरिम आदेश रद्द करण्यास तात्पुरता नकार दिला होता. उच्च न्यायालयाची ही स्थगिती सर्वाेच्च न्यायालयाने ५ मे २०१४ रोजी उठविली होती. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने फेरविचार करून ३१ जुलैपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानेच ही अंतिम सुनावणी होत असल्याने न्यायिक स्तरावर ‘टोल’चा कंडका पडणार आहे. (प्रतिनिधी)