शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

आकांक्षी योजना: कोल्हापूरसह ३८ शहरांमध्ये ४२ कोटींची शौचालये, मुताऱ्या

By समीर देशपांडे | Updated: September 2, 2023 12:59 IST

राज्य उच्चाधिकार समितीच्या बैठकीत या कामांना मान्यता देण्यात आली

समीर देशपांडेकोल्हापूर: स्वच्छ महाराष्ट्र अभियान, नागरी २.० अंतर्गत राज्यातील ३८ महापालिका, नगरपालिकांमध्ये तब्बल ४२ कोटी रुपये खर्चून शौचालये आणि मुताऱ्या उभारण्यात येणार आहेत. राज्य उच्चाधिकार समितीच्या बैठकीत या कामांना मान्यता देण्यात आली आहे.केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानच्या धर्तीवर राज्यामध्येही अभियान सुरू करण्यात आले आहे. याअंतर्गत महापालिका आणि नगरपालिकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार ५ जुलै २०२३ रोजीच्या उच्चाधिकारी समितीच्या पाचव्या बैठकीत हे प्रस्ताव मंजूर झाले आहेत.

यामध्ये प्रामुख्याने पुणे, चंद्रपूर, शेगाव, सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, कल्याण डोंबिवली या शहरांचा समावेश आहे; तसेच जेजुरी, अक्कलकोट, कुरुंदवाड, जि. कोल्हापूर, माहूर, वाई, पन्हाळा, तुळजापूर, माणगाव, लोणार, लोणावळा, सावंतवाडी, रामटेक, पाचगणी, पंढरपूर, सिंदखेडराजा या धार्मिक आणि पर्यटन शहरांचाही यामध्ये समावेश आहे.या ३८ शहरांमध्ये एकूण १०६८ शौचालयांच्या सीट उभारण्यात येणार असून ४४९ मुतारीची भांडी बसविण्यात येणार आहेत. यासाठी एकूण ४१ कोटी ८४ लाख रुपये खर्च येणार असून, त्यापैकी १० कोटी ८२ लाख ९५ हजार रुपये केंद्र शासन देणार असून ११ कोटी ७१ लाख रुपये राज्य शासन देणार आहे. तर या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना ५ कोटी ५७ लाख रुपये भरावे लागणार आहेत.

शौचालयांवर जाहिरातीआकांक्षी शौचालयांच्या देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च मिळणाऱ्या उत्पन्नातून भरून काढावा अशी शासनाची अपेक्षा आहे. यासाठी शौचालयाच्या भिंतीवर जाहिराती घेण्यापासून, ई-वाहनांसाठी चार्जिंग पॉइंट, व्यावसायिक दुकानांना त्या ठिकाणी जागा देणे, व्यायामशाळा, वाचनालय उभारून यातून निधी संकलित करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर