शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
6
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
7
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
8
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
9
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
10
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
11
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
12
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
13
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
14
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
15
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
16
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
17
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
18
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
19
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
20
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!

योग्य करिअर निवडण्याची आज अंतिम संधी

By admin | Updated: June 6, 2016 00:48 IST

‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर-२०१६’- स्टॉलवर विद्यार्थी, पालकांनी घेतली माहिती; शिक्षणाची अद्ययावत माहिती एकाच छताखाली

कोल्हापूर : दहावी, बारावीनंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करावे, शिक्षणासाठी कोणत्या अभ्यासक्रमांची निवड करावी याबाबतचे सर्वोत्तम पर्याय आणि सर्वांगीण सल्ला देणाऱ्या ‘रोबोमेट प्लस’ प्रस्तुत ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर-२०१६’ला रविवारी विद्यार्थी, पालकांची मोठी गर्दी उसळली. प्रदर्शनाचा आज, सोमवारी समारोप होणार असल्याने ग्लोबल करिअरच्या अजोड संधी व नव्या दिशांची माहिती मिळविण्याची ही शेवटची संधी आहे. येथील राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत सर्वांसाठी मोफत प्रवेश असणाऱ्या या प्रदर्शनात कोल्हापूरसह राज्यातील नामांकित शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या आहेत. करिअरबाबत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासह सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळत असल्याने प्रदर्शनाला मोठी गर्दी होत आहे. रविवारची सुटी असल्याने सकाळी दहा वाजल्यापासून प्रदर्शनाला विद्यार्थी, पालकांची गर्दी झाली. प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या आवडीनिवडीची विचारणा करून त्यांना संस्थेच्या विविध अभ्यासक्रम, त्यांच्या कालावधीसह शुल्काची सविस्तर माहिती दिली जात आहे. काही स्टॉलधारकांनी त्यांना चित्रफितींद्वारे अभ्यासक्रमातील विविध संधी, संस्थेच्या परिसराची माहिती दिली. विद्यार्थी, पालकदेखील शंकांचे निरसन करून घेत होते. प्रदर्शनाची वेळ संपेपर्यंत विद्यार्थी, पालकांची गर्दी होती. विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, हॉटेल मॅनेजमेंट, फॉरिन लँग्वेजीस, स्पोकन इंग्लिश, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कॅपिटल मार्केट, मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, ग्राफिक्स, फॅशन व इंटेरिअर डिझायनिंग व रिटेल, आयटीआय, एव्हिएशन, मीडिया, अ‍ॅनिमेशन, गेमिंग, आदी क्षेत्रांतील विविध अभ्यासक्रमांची माहिती प्रदर्शनात उपलब्ध आहे. शिवाय सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळत असल्याने पालक, विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, प्रदर्शनानिमित्त दिवसभर विविध सत्रांमध्ये मुलांच्या क्षमतेनुसार करिअर कसे निवडावे?, बँकिंग क्षेत्रातील करिअरच्या संधी, सध्याच्या स्थितीत तंत्रज्ञानामुळे सोपे झालेले शिक्षण आणि अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील विविध संधींबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक ‘रोबोमेट प्लस’ हे असून, डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अ‍ॅँड इंजिनिअरिंग हे सहप्रायोजक आहेत, दि न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेड, ट्रिनिटी, शिवगंगा सुझुकी हे सहायक प्रायोजक आहेत. (प्रतिनिधी)