शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

अपंगांना व्हेईकलद्वारे गतिमान करणाऱ्या ‘बबन’चा आज गौरव

By admin | Updated: December 5, 2015 00:54 IST

महाराष्ट्रासह कर्नाटकातूनही मागणी : साडेतीन हजारांहून अधिक हँडिकॅप व्हेईकलची निर्मिती

कोल्हापूर : पोलिओमुळे वयाच्या दुसऱ्या वर्षापासून दोन्ही पायांना अपंगत्व आलेल्या बबन साताप्पा सुतार यांनी अपंगत्वामुळे न डगमगता आयुष्याच्या प्रवासाची घोडदौड यशस्वीपणे सुरू ठेवली आहे. स्वत: कोल्हापूरमध्ये पहिल्यांदा अपंगांसाठी सोईस्कर अशा ‘हँडिकॅप व्हेईकल’ची निर्मिती केली. आपल्याला आलेल्या अडचणी इतरांनाही येऊ नयेत, म्हणून मागणीनुसार साडेतीन हजार गाड्या बनवून दिल्या. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ‘स्वर्गीय एच. आर. कोहली प्रेरणा पुरस्कार’ देऊन आज गौरव होत आहे.बबन सुतार दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून वडिलांना कामात मदत करु लागले. वडिलांच्या कामाचा व्याप वाढत गेला. त्यात अपंगत्वामुळे धावपळीचे काम ‘बबन’ला जमेना. त्यामुळे वडिलांनी तुला कायनेटिकची अपंगांसाठीची चारचाकांची दुचाकी घेऊ म्हणून डिलरकडे नेले. तिथे या गाड्यांसाठी सहा महिन्याची प्रतीक्षा यादी होती. त्यामुळे बबनची निराशा झाली. आपण नेहमीची कायनेटिक गाडी घेऊ आणि त्याला जादाची चाके लावू, असा विश्वास वडिलांना विचार करून दिला. त्यातून गाडी खरेदी करून त्यात अपंगांसाठी सोईस्कर ‘हँडिकॅप व्हेईकल’ची निर्मिती केली. त्यामुळे बबनला काम करण्यासाठी हे आणखी मोठे बळ मिळाले. पुढे वडिलांच्या निधनानंतर आई मालूबाई यांनी आधार दिला. वडिलांच्या हाताखाली काम करत त्यांनी नेहरूनगर येथे खत्री लॉनलगत एका पत्र्याच्या शेडमध्ये आपले सुतारकाम व फॅब्रिकेशन सुरू केले. कामासाठी इतर ठिकाणी फिरताना गाडी कुठे व कोणी केली, याची माहिती अनेक अपंगमित्र बबन यांच्याकडून घेऊ लागले. होय-नाही करत एका गाडीची निर्मिती केली. ही गाडी पसंतीसही उतरली. मग हळू-हळू कोल्हापूरसह राज्यभरातून अनेक अपंग मित्रांची अशा प्रकारच्या गाडी बनविण्यासाठी चौकशी होऊ लागली. त्यात बजाज, होंडा आदी मोटारसायकल घेऊन त्याला जादाची दोन चाके बसवून सोईस्कर ‘हँडिकॅप व्हेईकल’ची निर्मिती केली. एक-एक म्हणता म्हणता साडेतीन हजार गाड्यांना अशी सोय बबन यांनी करून दिली. महाराष्ट्रासह कर्नाटकातूनही गाडीसाठी मागणी येऊ लागली आहे. या कार्याची दखल घेऊन एच. आर. कोहली प्रेरणा पुरस्काराने त्यांचा आज, शनिवारी गौरव करण्यात येणार आहे. बबन यांच्यासह संजय पोवार यांच्या ‘बेस्ट सर्पोट फोर डिसेबल्ड पुरस्कारा’ने, तर उज्ज्वला चव्हाण यांचा ‘पॅरा क्रीडारत्न’ पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)चारचाकीसाठी किट तयार करण्याचे प्रयत्नअपंगांची अधिक सोय व्हावी, म्हणून मोटारसायकलला हँड गिअर बसवून दिले. जिवलग मित्र युनूस शेख यांच्या प्रेरणेने चारचाकी गाडीही अपंगांना चालवायला येईल, असे किट तयार करण्याचा प्रयत्न बबन यांनी सुरू केला आहे. बबन यांच्या प्रयत्नांमुळे हजारो अपंगांना वाहनरूपी पंख मिळाल्यामुळे स्वत:च्या पायावर उभारण्याचे बळ मिळाले. त्यातून दुसऱ्याच्या आधाराशिवाय काही करू न शकणारे अपंगमित्रही या गाडीचा वापर करून आपली नित्य कामेही करू लागली. मागणी वाढत कधी हजारोंचा आकडा पार करून गेला हे बबन यांना कळालेही नाही.