शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महासभेत घरफाळा विषयावरून होणार खडाजंगी-आज सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 19:34 IST

शहरातील मिळकतींच्या कर आकारणीत कोणतीही वाढ न करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समिती सभेने चर्चा करण्यासाठी आज, मंगळवारच्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवला असला तरीही या विषयावर सखोल चर्चा होऊन त्याला उपसुचना देऊन सुमारे १५०० चौ. फुटांपेक्षा जादा मिळकतीच्या करात

ठळक मुद्देपाणीपट्टी, परवाना, नगररचना शुल्कवाढीला विरोध होणार

कोल्हापूर : शहरातील मिळकतींच्या कर आकारणीत कोणतीही वाढ न करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समिती सभेने चर्चा करण्यासाठी आज, मंगळवारच्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवला असला तरीही या विषयावर सखोल चर्चा होऊन त्याला उपसुचना देऊन सुमारे १५०० चौ. फुटांपेक्षा जादा मिळकतीच्या करात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, याशिवाय पाणीपट्टी, नगररचना शुल्क, परवाना विभागाच्या करात काही प्रमाणात वाढ सुचविली आहे, पण ही वाढ फेटाळण्याची शक्यता आहे.

महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज, मंगळवारी सकाळी ११ वाजता महापौर सरिता मोरे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. या सभेत घरफाळासह विविध विषयावर चर्चा होणार आहे. सध्या महानगरपालिका हद्दीत सुमारे १ लाख ५२ हजार मिळकती असून, त्यापैकी सुमारे २७ हजार मिळकती या कमर्शिअल आहेत, तर त्यापैकी १० हजार ८०० मिळकती भाडेपट्टीने कुळाला दिलेल्या आहेत.

२०१८-१९ मधील आकारणीप्रमाणेच २०१९-२० मध्येही मिळकतींची कर आकारणी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला होता, त्यावर निर्णय न घेता चर्चेसाठी महासभेसमोर ठेवला आहे. त्यामुळे आज, मंगळवारच्या सभेत या घरफाळा विषयावर सविस्तर चर्चा होणार आहे. त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांवर करवाढीचा बोजा न टाकता प्रस्तावास उपसूचना देऊन सुमारे १५०० चौ. फुटांपेक्षा अधिक मिळकतीचा फाळा काही प्रमाणात वाढविण्याची शक्यता आहे.याशिवाय पाणीपुरवठा, नगररचना, परवाना, इस्टेट आदींच्याही करात वाढ करण्याच्या प्रस्तावाला जोरदार विरोध होऊन चर्चेअंती ही दरवाढ फेटाळण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.- शहरात एकूण मिळकती : १,५२,०००- कमर्शिअल मिळकती : १६,८२०- भाडेपट्टी (कूळ) : १०,१८० 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर