शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

समीरच्या ब्रेन मॅपिंगची आज सुनावणी

By admin | Updated: October 3, 2015 01:22 IST

गोविंद पानसरे हत्या प्रकरण

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित, सनातन संस्थेचा साधक समीर विष्णू गायकवाड याच्या ब्रेन मॅपिंग तपासणीवर आज, शनिवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांच्यासमोर सुनावणी होत आहे. तपासकामात समीर गायकवाड हा सहकार्य करीत नसल्याने त्याच्याकडून आणखी माहिती मिळविण्यासाठी त्याची बे्रन मॅपिंग तपासणी करण्यासाठी परवानगी मिळावी, असा अर्ज न्यायालयाकडे सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी केला होता. आरोपीच्या वकिलांनी समीरच्या ब्रेन मॅपिंग तपासणीसाठी सरकारी वकिलांनी केलेल्या अर्जावर आक्षेप घेतला. समीरला एकच दिवसापूर्वी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तूर्त त्याची मानसिकता व्यवस्थित होणे अद्याप शक्य नाही; त्यामुळे लगेच बे्रन मॅपिंग तपासणी करणे सयुक्तिक होणार नाही. त्यामुळे बे्रन मॅपिंग तपासणीच्या अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी आठवड्याची मुदत द्यावी, अशी मागणी आरोपीचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केली. ही वाढीव मुदतीची मागणी खोडताना सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी, कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचा तपास गतीने सुरू आहे. तपासाला दिशाही गतीने मिळाली आहे. या तपासकामात खंड पडू नये यासाठी ब्रेन मॅपिंगची तपासणी करणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद मांडला. ब्रेन मॅपिंग तपासणीवर निर्णय उशिरा घेतल्यास गतीने सुरू असणाऱ्या तपास कामात खंड पडण्याची शक्यता आहे. म्हणून लवकरात लवकर ब्रेन मॅपिंगची तपासणी करण्याची परवानगी द्यावी, अशीही मागणी सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी केली होती. यावेळी दोन्हीही बाजंूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश डांगे यांनी आज, शनिवारी पुढील सुनावणी ठेवली आहे. (प्रतिनिधी)