शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

देवस्थान समिती विरोधात आज मोर्चा : राजेश क्षीरसागर

By admin | Updated: February 2, 2015 00:23 IST

अधिवेशनात लक्षवेधी मांडणार

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात उद्या, सोमवारी सकाळी दहाला गांधी मैदानातून मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर, श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीचे प्रवक्ते सुनील घनवट व अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी आज, रविवारी पत्रकार परिषदेत दिली.देवस्थान समीतीकडे अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिरासह ३०६४ मंदिरे व २३ हजार एकर जमिनी, अलंकार, रोख रक्कम अशी कोट्यवधींची संपत्ती आहे. समितीच्या अध्यक्षांनी, सदस्यांनी व कर्मचाऱ्यांनी, शासकीय अधिकाऱ्यांनीही कारभारात प्रचंड भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले आहे. संबंधितांना कठोर शासन व्हावे व या कारभाराची सीबीआय चौकशी व्हावी या मागणीसाठी हा मोर्चा काढला आहे. हा मोर्चा बिंदू चौकात विसर्जित होईल. त्यानंतर विविध संघटनांचे पदाधिकारी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देतील. या मोर्चाला विविध तरुण मंडळे, तालीम मंडळे, हिंदुत्ववादी संघटना, सामाजिक संस्थांनी पाठिंबा दर्शविल्याचे संयोजकांनी सांगितले. (प्रतिनिधी)अधिवेशनात लक्षवेधी मांडणार : क्षीरसागर देवस्थान समितीवरील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बड्या धेंडांनी जमिनी बळकावल्या आहेत. युती सरकारने दोषींवर कारवाई करून सध्याची समिती बरखास्त करावी. ही समिती नव्याने स्थापन करावी, यासाठी अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करावा : देसाईप्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई म्हणाले, देवस्थान समितीतील भ्रष्टाचाराचे पुरावे परीक्षण समितीला मी दिले होते. मात्र, त्याची समिती व प्रशासनानेही दखल घेतलेली नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रश्न शासनदरबारी मांडला होता. आता सत्तेत आल्यानंतर मात्र त्यांनी याचा पाठपुरावा केलेला नाही.