शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आजऱ्याकडे जिल्ह्याचे लक्ष -नगरपंचायतीचा उद्या निकाल : मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:32 IST

कोल्हापूर : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आजरा नगरपंचायतीच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल उद्या, गुरुवारी लागणार आहे. या निवडणुकीमध्ये जिल्ह्यासह स्थानिक मातब्बर

कोल्हापूर : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आजरा नगरपंचायतीच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल उद्या, गुरुवारी लागणार आहे. या निवडणुकीमध्ये जिल्ह्यासह स्थानिक मातब्बर नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. नगराध्यक्षपदासाठी तीन, तर नगरसेवकपदाच्या १७ जागांसाठी १९ अपक्षांसह ७० उमेदवारांचे भवितव्य उद्या, गुरुवारी कळणार आहे.

या निवडणुकीत थेट भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढली गेली नसली तरी भाजपच्या नेत्यांच्या पाठबळावर आजरा साखर कारखान्याचे चेअरमन अशोक चराटी हे निवडणुकीच्या रिंंगणात उतरले. नगर पंचायत मंजूर करून आणण्यासाठी केलेले प्रयत्न ही जमेची बाजू असल्याने त्यांनी कन्या ज्योत्स्ना चराटी-पाटील यांनाच थेट नगराध्यक्षाच्या जागेसाठी उतरविले. प्रत्यक्ष पालकमंत्री चंद्रकांत पाटील आजºयात आले नसले तरी त्यांनी आपले पाठबळ चराटी यांच्या पाठीशी लावले. आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शौमिका महाडिक, बाबा देसाई यांनी प्रचारसभा घेतल्या.

दुसरीकडे, जिल्हा परिषदेचे सदस्य जयवंतराव शिंपी यांनी पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य अलका शिंपी यांना थेट नगराध्यक्षपदासाठी रिंंगणात आणून कॉँग्रेसला सोबत घेताना शिवसेनेतील एक गटही आपल्यासोबत ठेवला. हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील या दोन माजी मंत्र्यांचे किती सख्य आहे हे यानिमित्ताने पुन्हा स्पष्ट झाले. या दोघांनीही आजºयात परस्पर सामंजस्याने जागा लढविल्या. या दोघांसह के. पी. पाटील, ए. वाय. पाटील यांनी प्रचारसभांचा धडाका लावला.

जितेंद्र आव्हाडांसारखा आक्रमक नेता प्रचारासाठी आणला.अनपेक्षितपणे माजी सरपंच आणि आजरा साखर कारखान्याचे संचालक भाजपचे जनार्दन ऊर्फ जितू टोपले यांनी बंडाचा झेंडा उभारून सर्व मुस्लिम नेत्यांच्या मदतीने तिसºया आघाडीची मोट बांधली. टोपले यांच्या पत्नी माजी उपसरपंच स्मिता टोपले या रिंंगणात आहेत. उशिरा का होईना, आपल्या विधानसभेची काळजी करीत आमदार प्रकाश आबिटकर यांनी या आघाडीला बळ देण्याचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे तर अर्जुन आबिटकर यांनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह आजºयात तळ ठोकला. आबिटकर आणि टोपले यांनी नेटाने प्रचारयंत्रणा राबवीत आव्हान निर्माण केले.गुरुवारी लागणारा निकाल हा तालुक्याच्या आगामी राजकारणाची दिशा ठरविणारा आहे. सध्या चराटी आणि शिंपी यांनी नगराध्यक्षपदासह बहुमत मिळविणार असल्याचे दावे केले असून, तिसरी परिवर्तन आघाडी धक्कादायक भूमिकेत असेल, असा आत्मविश्वास टोपले यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे गुरुवारच्या या निकालाचे औत्सुक्य वाढले आहे.

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूर