शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

महाडिक-सतेज पाटील गटाचे आज अर्ज

By admin | Updated: March 23, 2015 00:33 IST

‘राजाराम’ची रणधुमाळी : शक्तिप्रदर्शन नाही

कसबा बावडा : राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज, सोमवारी अर्ज दाखल करावयाच्या शेवटच्या दिवशी आमदार महादेवराव महाडिक आणि माजी मंत्री सतेज पाटील गटाचे अर्ज दाखल होणार आहेत.करवीर, हातकणंगले, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी आणि कागल अशा सात तालुक्यांतील १२२ गावांत कार्यक्षेत्र असलेल्या कसबा बावडा (ता. करवीर) येथील राजाराम साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा धुरळा आता सर्वत्र जोरात उडाला आहे. चुरसही वाढली आहे. १९ एप्रिलला मतदान आणि २० एप्रिलला निकाल असणाऱ्या या निवडणुकीसाठी गुरुवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत तब्बल २१९ अर्जांची विक्री होऊन ६८ जणांनी अर्ज दाखल केले.या निवडणुकीत आमदार महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील गटातील टोकाचा संघर्ष पुन्हा एकदा पाहावयास मिळणार आहे. दोन्हीही गटांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मंगळवारी (दि. २४) छाननी होणार आहे, तर २५ तारखेला छाननीनंतरची उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. बुधवारी (दि. ८ एप्रिल)पर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. ९ एप्रिलला पात्र उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.दरम्यान, आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी दोन्हीही गटांकडून कोणत्याही प्रकारचे शक्तिप्रदर्शन करण्यात येणार नाही. जशा नेत्यांकडून सूचना येतील, त्याप्रमाणे उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. आतापर्यंत सत्तारूढ आणि विरोधी अशा दोन्ही गटांकडून काही उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. तरीही आज आणखी अर्ज दाखल केले जाणार आहेत. (प्रतिनिधी)