शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कडेगावात आज ताबुतांच्या भेटी

By admin | Updated: November 3, 2014 23:28 IST

उभारणी पूर्ण : अंबील मिरवणूक उत्साहात; गुरुवारी कुस्ती मैदान

रजाअली पीरजादे - शाळगाव -कडेगाव येथील उंच ताबुतांची उभारणी पूर्ण झाली असून उद्या (मंगळवारी) ताबुतांच्या भेटी होणार आहेत. मोहरमनिमित्त कडेगावात कालपासून यात्रेला सुरुवात झाली. राष्ट्रीय एकात्मता आणि उंच ताबुतांसाठी प्रसिद्ध असलेल्या मोहरम सणाची सर्व तयारी पूर्ण झाली असून, शिवाजी चौकात विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले आहेत.आज पहाटेपासून पारंपरिक पद्धतीने फातेहा होऊन ताबूत उभारणीला सुरुवात करण्यात आली. मोहरमनिमित्त एकूण १४ ताबूत-पंजे बसविले जातात. ताबुतांचे बांधकाम एक महिना अगोदर सुरू होते. आज सायंकाळी ताबुतांची उभारणी पूर्ण झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने पाटील वाड्यापासून अंबीलची मिरवणूक काढण्यात आली. ती पिरजादे वाड्यातून मसुदमाला बारा इमाम येथे नेण्यात आली. कत्तलरात्र असल्याने मानाच्या सातभाई ताबुताजवळ आणि मसुदमाला येथे लोकांनी गर्दी केली होती.गावात जय्यत तयारीगुरुवारी सकाळी जियारतीचा कार्यक्रम. दुपारी चारला पाटील चौकात जंगी कुस्त्यांचे मैदान होईल.कडेगाव येथील पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ११ अधिकाऱ्यांसह १४० पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती.सर्व तयारी पूर्ण : सरपंच विजय शिंदे, उपसरपंच अविनाश जाधवकत्तलरात्रीनिमित्त ताबुतांच्या ठिकाणी महिलांची प्रचंड गर्दी. रात्री खास गोरख सोंगाचा सामना पार पडला.काही परदेशी पर्यटक दाखलजादा एसटी गाड्यांची सोयअसे असतील उत्सवाचे कार्यक्रमउद्या, मंगळवार, दि. ४ रोजी भेटीचा महत्त्वाचा सोहळा पार पडणार आहे. सकाळी दहाला पूजा होऊन मानाचा पहिला सातभाई यांचा ताबूत उचलण्यात येईल. त्यानंतर भाऊसाहेब देशपांडे, हकीम, आतार, बागवान यांचे मानाप्रमाणे ताबूत उचलण्यात येतील. हे सर्व ताबूत पाटील चौकात सकाळी अकरापर्यंत येतील. पाटील चौकातून हे सर्व ताबूत वाजत-गाजत ओळीने भेटीच्या ठिकाणी मोहरम चौकात एकत्र येतील. तेथे ‘महान भारत देश आमुचा, घुमवू जय जयकार’ आणि ‘प्यारा प्यारा हमारा देश प्यारा’ अशा प्रकारची राष्ट्रीय एकात्मतेची गाणी म्हटली जातील. सर्व मेलवाले व करबलवाले राष्ट्रीय एकात्मतेची आणि मोहरमची गाणी गातील. त्यानंतर सुतार, इनामदार यांचे मोठे ताबूत आणले जातील. शेवटी मानकऱ्यामार्फत मसुदमाला ताबूत पंजे, बारा इमाम पंजे आणले जातील. दुपारी एक वाजता ताबुतांच्या अधिकृत भेटींना सुरुवात होईल. मानाप्रमाणे भेटी होऊन सर्व ताबूत-पंजे मिरवणुकीने आपापल्या जागी रवाना होतील. ताबुतांच्या भेटीचा सोहळा दुपारी दोनपर्यंत पूर्ण होईल. मोहरमनिमित्त गुरुवारी कुस्त्यांचे मैदान आणि जियारत होणार आहे.