शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकांचा आज अर्धा दिवस बंद

By admin | Updated: March 11, 2016 00:09 IST

सराफ बंदला पाठिंबा : गायकवाड, ओसवाल यांची माहिती

कोल्हापूर : अबकारी कराला विरोध करण्यासाठी सराफ व्यावसायिकांचे गेले दोन आठवडे आंदोलन सुरू केले आहे. त्यानिमित्त आज, शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात शहरातील व्यापारी, उद्योजक, दुकानदार, आदी व्यावसायिक आपले सर्व व्यवहार दुपारपर्यंत बंद ठेवून सहभागी होणार असल्याची माहिती सराफ संघाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड व जिल्हाध्यक्ष भरत ओसवाल यांनी दिली. दरम्यान, खासदार, मंत्री, आमदार यांना पदाधिकारी भेटून निवेदन देण्यात येणार आहे.आज सकाळी १० वाजता श्री अंबाबाई मंदिर येथे श्रीफळ वाढवून मोर्चाला प्रारंभ होत आहे. यावेळी माणिक जैन, राजेश राठोड, बाबा महाडिक, स्वप्निल शहा, विजयकुमार भोसले, मनोज राठोड, आदी उपस्थित होते.दरम्यान, आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यासह कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स, दैवज्ञ बोर्डिंग, बंगाली कारागीर, टंच असोसिएशन, सोने-चांदी मणी कारागीर संघटना, चांदी मूर्ती कारागीर असोसिएशन, चांदी कारखानदार असोसिएशन, पास्टा संघटना, पॉलिश संघटना, पांचाल सोनार आणि दैवज्ञ ब्राह्मण सेवा संघ, मनसे, अंगडिया सर्व्हिस अशा संस्था, संघटनांनी बंदला पाठिंबा दिला आहे. प्रश्न केंद्रात मांडू : सतेज पाटीलदरम्यान, गुजरी येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी आमदार सतेज पाटील, महापौर अश्विनी रामाणे यांनी भेट देऊन अबकारी कराचा प्रश्न केंद्रात मांडू, असे आश्वासन सराफ व्यावसायिकांना दिले. आमदार पाटील म्हणाले, या ‘बंद’चा अधिक तोटा ग्राहकालाच होत आहे. बंद पाळून आम्ही कराला विरोध करीत आहोत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू. मोर्चात सहभागाचे चेंबर आॅफ कॉमर्सचे आवाहनअबकारी कर व पॅनकार्ड सक्तीच्या निषेधार्थ सराफ व्यावसायिकांनी बेमुदत बंद पुकारला आहे. रूपांतरित कराच्या नोटिसा, त्यासाठी जप्तीची टांगती तलवार, प्रस्तावित घरफाळा वाढ, २० टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव यामुळे सर्वसामान्य व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे व्यापारी, उद्योजकांची एकजूट आवश्यक बनल्याने सराफ व्यावसायिकांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून आज, शुक्रवारी होणाऱ्या मोर्चात इतर सर्व व्यावसायिकांनी दुकाने, व्यवसाय बंद ठेवून सहभागी व्हावे, असे आवाहन चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने सर्व संलग्न व्यापारी, औद्योगिक संघटना व त्यांच्या सदस्यांना करण्यात येत असल्याचे आवाहन अध्यक्ष आनंद माने, उपाध्यक्ष संजय शेटे, सुरेंद्र जैन यांनी केले आहे.