शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तीन नगरसेवकांच्या अपात्रतेचा आज फैसला कुरुंदवाड नगरपालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 23:59 IST

येथील पालिकेतील राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांच्या अपात्रतेचा निर्णय आज, बुधवारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वादी व प्रतिवादी नगरसेवकांत धाकधूक वाढली असून जिल्हाधिकारी कोणता निर्णय देतात,

ठळक मुद्देनगरसेवकांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष

गणपती कोळी ।कुरुंदवाड : येथील पालिकेतील राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांच्या अपात्रतेचा निर्णय आज, बुधवारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वादी व प्रतिवादी नगरसेवकांत धाकधूक वाढली असून जिल्हाधिकारी कोणता निर्णय देतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, या निकालावरुन शहरात व पालिकेत मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे.पालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आहे तर भाजप विरोधी बाकावर आहे. राष्ट्रवादीचे पाच नगरसेवक असून अवघ्या वर्षभरातच राष्ट्रवादी नगरसेवकांत फूट पडली. आघाडी नेते रावसाहेब पाटील व पक्षप्रतोद जवाहर पाटील यांच्या पक्षीय कारभारावर आक्षेप घेत तीन महिन्यापूर्वी पालिकेच्या उपनगराध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीचे किरण जोंग, स्नेहल कांबळे व नरगीस बारगीर यांनी पक्षाचा व्हीप डावलून विरोधी मतदान केले होते.

व्हीपचा आदेश डावलल्याने पक्षप्रतोद जवाहर पाटील यांनी विरोधात गेलेल्या तीनही नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द व्हावे, अशी तक्रार जिल्हाधिकाºयांच्याकडे केली होती. गेली अडीच महिने दोन्ही बाजंूच्या नगरसेवकांनी वकिलांमार्फत जिल्हाधिकारी यांच्यापुढे आपले म्हणणे मांडले होते. ९० दिवसांत या प्रकरणाचा निकाल देणे जिल्हाधिकाºयांना बंधनकारक आहे. गुरुवारी (दि. १२) हा कार्यकाल पूर्ण होणार असल्याने आजच जिल्हाधिकारी निकाल देण्याची शक्यता आहे.वादी व प्रतिवादी नगरसेवकांनी प्रतिष्ठा पणाला लावली असून विरोधात गेल्यास अपिलात जाण्याचीही तयारी केली आहे. त्यामुळे या निकालाकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले असून दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांत धाकधूक वाढली आहे. दरम्यान, नगरसेवकपद अपात्र ठरल्यास कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. एकूणच या निकालावरुन शहरातील व पालिकेतील राजकारणात मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता आहे....तर सत्ता अल्पमतात!पालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आहे. भाजप विरोधी बाकावर आहे. उपनगराध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीच्या या तीनही नगरसेवकांनी भाजपपुरस्कृत सुशील भबिरे यांच्या बाजूने मतदान केले होते. त्यामुळे निर्माण झालेल्या वादात या तीनही नगरसेवकांच्या बाजूने भाजप सक्षमपणे उभे राहिला आहे. जिल्हाधिकाºयांच्या या निर्णयात राजकीय हस्तक्षेप (पालकमंत्र्यांचा अप्रत्यक्ष सहभाग) झाला व राष्ट्रवादीच्या पक्षप्रतोदाचा अर्ज फेटाळून नगरसेवकपद पात्र ठेवल्यास तीनही नगरसेवक भाजपत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेतील काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता अल्पमतातही येऊ शकते.निर्णय अपिलात जाणार? जिल्हाधिकाºयांचा निकालवादी अथवा प्रतिवादी यांच्याविरोधात गेल्यास त्यांना अपिलात जाता येते. त्यामुळे हा वाद नगरविकास राज्यमंत्र्यांच्या कोर्टात जाऊ शकतो. त्यांना सहा महिन्यांत या अपिलावर निर्णय देणे बंधनकारक आहे.