शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

टोल आंदोलनात आज धरण

By admin | Updated: September 18, 2014 00:09 IST

कृती समिती : सलगच्या आंदोलनामुळे घेतली विश्रांतीे

कोल्हापूर : सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या दौऱ्यानिमित्त सलग दोन दिवस आंदोलन केल्यानंतर आज, बुधवारी आंदोलनास विश्रांती दिली. उद्या, गुरुवारी कॉमर्स कॉलेजच्या दारात सायंकाळी चार वाजता धरणे आंदोलन व कोपरा सभा होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कृती समितीचे अ‍ॅड. बाबा इंदुलकर यांनी केले आहे.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होताच, टोलप्रश्नी राज्य शासनाकडून तोडगा निघण्याची आशा मावळली. यानंतर संतप्त झालेल्या सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने निवडणुकीच्या मतदानापर्यंत २९ दिवस विविध मार्गांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.माजी केंद्रीय मंत्री शरद पवार सोमवार व मंगळवार दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी शिवाजी चौकात निदर्शने व काही कार्यकर्त्यांनी मुंडण करीत निषेध व्यक्त केला. सलगच्या आंदोलनामुळे आज कृती समितीने आंदोलन स्थगित ठेवले. उद्यापासून पुन्हा जोमाने आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला.१०० दिवस कशाला? २९ दिवस बस्स आहेत!उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याची सत्ता द्या; १०० दिवसांत कोल्हापूर टोलमुक्त करतो, असे जाहीर आश्वासन दिले आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना कृती समितीतर्फे बाबा इंदुलकर यांनी पलटवार केला. गेल्या साडेतीन वर्षांत टोलबाबत निर्णय घेऊ शकला नाहीत. न्यायालयातही राज्य शासनाने जाणीवपूर्वक कमकुवत बाजू मांडली. यामुळे १०० दिवसांची पुन्हा वाट पाहत बसण्यापेक्षा येत्या २९ दिवसांत या आघाडी शासनाला घरी बसविलेले कधीही चांगले, अशी प्रतिक्रिया इंदुलकर यांनी व्यक्त केली.