शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
3
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
4
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
5
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
6
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
7
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
8
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
9
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
10
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
11
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
12
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
13
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
14
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
15
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
16
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
17
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
18
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
19
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
20
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला

तंबाखू व्हॅटप्रश्नी लवकरच निर्णय घेऊ

By admin | Updated: January 3, 2015 00:16 IST

सुधीर मुनगंटीवार : जयसिंगपुरातील शिष्टमंडळाने मांडले गाऱ्हाणे

जयसिंगपूर : अनुत्पादित तंबाखूवरील साडेबारा टक्केव्हॅटप्रश्नी येत्या दहा दिवसांत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जयसिंगपूर येथील शिष्टमंडळाला दिले. आंध्र, कर्नाटक व गुजरात या राज्याच्या वित्तमंत्री व वित्तसचिव यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ, असेही आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिले.आघाडी सरकारच्या काळात राज्यातील अनुत्पादित तंबाखूवर साडेबारा टक्के व्हॅट लागू करण्यात आला होता. राज्यातील एक प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या जयसिंगपूर शहरातील तंबाखू व्यवसाय व्हॅटमुळे मोडकळीस आला आहे. वेळोवेळी याप्रश्नी शासनकर्त्यांकडे पाठपुरावा करण्यात आला होता. व्यापारी आणि कामगारांच्या मागणीकडे शासनकर्त्यांकडून दुर्लक्ष झाल्यामुळे व्हॅटचा तिढा सुटला नाही. नव्या सरकारकडून हा प्रश्न सुटेल यासाठी पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान, व्हॅटप्रश्नी आज, शुक्रवारी मुंबई येथे मंत्रालयात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमेवत तंबाखू व्यापारी तसेच खासदार राजू शेट्टी, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार उल्हास पाटील यांनी बैठक घेतली. तंबाखूवरील व्हॅटमुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे हा प्रश्न लवकरात लवकर निकालात निघावा, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. आंध्र, कर्नाटक, गुजरात या राज्यांमध्ये तंबाखूवर व्हॅट आकारला जात नाही. याबाबत महाराष्ट्रात कसा तोडगा निघेल, यासाठी तिन्ही राज्यांच्या वित्तसचिव व मंत्र्यांची लवकरच बैठक घेतली जाईल. येत्या दहा दिवसांत याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन ना. मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.शिष्टमंडळात भाजपचे मंडल अध्यक्ष विठ्ठल पाटील, राजेंद्र दार्इंगडे, सुरेश शिंगाडे, सुनील शर्मा, व्यापारी प्रमोद चोरडिया, गोपाळ मालू, प्रसन्न लुनिया, प्रसन्न बलदवा, गोविंद बजाज यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)