शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

निपाणी भागात तंबाखूला १५० रुपये उच्चांकी दर

By admin | Updated: March 24, 2015 00:19 IST

शेतकऱ्यांतून समाधान : गुजरातचे बिछाईत दाखल, हंगामातील तंबाखू खरेदी-विक्रीला प्रारंभ

राजेंद्र हजारे - निपाणी  कर्नाटक सीमाभागातील निपाणी आणि परिसरात यंदाच्या हंगामातील तंबाखू खरेदी-विक्रीला प्रारंभ झाला आहे. सुरुवातीच्या काळापासूनच तंबाखूला खर्चाच्या तुलनेत चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. यंदा खरेदी-विक्रीच्या हंगामाच्या पहिल्या आठवड्यातच निपाणी, अकोळ, खडकलाट येथील दर्जेदार तंबाखूला ९० ते १५० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे.कापशी खोऱ्यातील तंबाखूने शंभरी उलटल्याने निपाणी परिसरात दीडशतकी दराची अपेक्षा होती. गतआठवड्यात निपाणी परिसरात १४५ रुपये प्रति किलो दराने तंबाखू खरेदी झाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. आता अकोळ येथील तंबाखूला १५३ रुपयांपर्यंत दर मिळाला आहे.यंदाच्या तंबाखू पिकाचा हंगाम प्रथमपासूनच चांगल्या पद्धतीने पार पडला आहे. सुरुवातीस तंबाखू तरूच्या टंचाईने लावणी हंगामाची दमछाक झाली. तरीही पावसाने गरजेवेळी हजेरी लावल्याने तंबाखूला पोषक वातावरण निर्माण झाले. भरणीही चांगल्याप्रकारे झाल्याने वजनाबरोबर दर्जाही चांगला राहिला आहे. मध्यंतरी वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या छातीत धडकी भरली होती, पण थोडक्यात सावरल्याने शेतकऱ्यांवरील संकट बाजूला झाले.यंदा तंबाखू खरेदीचा हंगाम फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाला. पहिल्याच टप्प्यात कापशी खोऱ्यात १०० ते ११० रुपये प्रति किलो दर देण्यात आला. थोड्याफार फरकाने अन्यत्रही खरेदी व्यवहारांना प्रारंभ झाला.किरकोळ व्यापाऱ्यांनी पळून-पळून खेळ सुरू केला आहे. जमेल आणि जुळेल तितका तंबाखू खरेदी करून व्यापाऱ्यांना विकण्यासाठी किलोमागे पाच-पन्नास रुपये सुटल्यास बिघडले कुठे, असा एक नवाच प्रकार अस्तित्वात आला आहे. मिळेल तेथून मिळेल त्या दराने मिळेल तितका तंबाखू खरेदी करण्याचे प्रस्थ सुरू झाले आहे. मग किरकोळ व्यापाऱ्यांनी लहान-लहान तंबाखू ९० ते १०० रुपयांपर्यंत प्रतिकिलो दराने खरेदी केला.यंदाच्या तंबाखूला गुणवत्ता व दर्जा चांगल्या असल्याने या मंडळींनी थांबण्याचे नावच काढले नाही. सध्या गुजरात, बंगलोर, मंगळूर, जयसिंगपूरसह अन्य विभागातील बिछाईतदारांनी निपाणी भागात तंबाखू खरेदीला सुरुवात केली आहे. गुजरात विभागात तंबाखूचे उत्पादन कमी झाल्याने या भागातील तंबाखू खरेदीवर भर देण्यात आला आहे. यंदा तंबाखूचा स्वाद व दर्जा चांगला असल्याने दरही विक्रमी मिळत आहे. लवकरच मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीला सुरुवात होणार आहे.