शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

माध्यमिक शिक्षकांना मिळणार थकीत वेतन : शिक्षण संचालकांची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:46 IST

संतोष मिठारी ।कोल्हापूर : तब्बल एक वर्षानंतर माध्यमिक शिक्षकांना त्यांचे तीन महिन्यांचे थकीत वेतन आता एप्रिलमध्ये मिळणार आहे. वेतन अदा करण्यास राज्य शिक्षण संचालकांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे एक हजार शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.सन २०१५-१६ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे वेतन दि. १ डिसेंबर २०१६ पासून समायोजित ...

ठळक मुद्देवर्षभराच्या पाठपुराव्याला यश; एकहजार शिक्षकांना दिलासा

संतोष मिठारी ।कोल्हापूर : तब्बल एक वर्षानंतर माध्यमिक शिक्षकांना त्यांचे तीन महिन्यांचे थकीत वेतन आता एप्रिलमध्ये मिळणार आहे. वेतन अदा करण्यास राज्य शिक्षण संचालकांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे एक हजार शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

सन २०१५-१६ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे वेतन दि. १ डिसेंबर २०१६ पासून समायोजित शाळेतून काढावे, असा आदेश शिक्षण आयुक्तांनी पारित केला. त्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागातील अतिरिक्त शिक्षकांना हजर करून घेतले नसलेल्या सर्व समायोजित शाळेतील शिक्षकांचे वेतन अदा झाले नव्हते. यावर शिक्षक संघटनांनी आंदोलन करून वेतन अदा करण्याची मागणी केली.

यानंतर शिक्षण विभागाकडून मार्च २०१७ मध्ये वेतन अदा करण्याचा आदेश झाला; पण अतिरिक्त शिक्षकांना शालार्थ प्रणालीमध्ये अटॅच आणि डीटॅच करण्याच्या प्रक्रियेत वेतन अदा करण्यात अडचणी निर्माण झाल्या. यातच मार्च २०१७ पूर्वीचे वेतन शिक्षण संचालकांच्या परवानगीशिवाय अदा करण्यात येऊ नये, असा शिक्षण विभागाकडून आदेश जुलै २०१७ मध्ये मंजूर करण्यात आला.

या आदेशामुळे माध्यमिक शाळांमधील शिक्षकांचे डिसेंबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या कालावधीतील वेतन रखडले. हे वेतन अदा करण्याबाबत खासगी शिक्षक महासंघ, महानगर माध्यमिक शिक्षक संघाने शिक्षण उपसंचालक, संचालक आणि आयुक्तांकडे सातत्याने पाठपुरावा केला. याबाबत शिक्षण संचालकांनी माध्यमिक शिक्षकांचे हे थकीत वेतन अदा करण्यास मंजुरी देऊन याबाबतचे आदेश वेतन पथक कार्यालयास गुरुवारी (दि. २९) दिले आहेत. या आदेशांमुळे माध्यमिक शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. 

अतिरिक्त व नियमित शिक्षकांच्या थकीत वेतन अदा करण्याच्या लढ्याला शिक्षक आमदार ना. गो. गाणार यांनी ताकद दिली. थकीत वेतन अदा करण्याचा निर्णय झाल्याने आमदार गाणार आणि शिक्षण विभागाचे आभार मानतो. पुढील काळात थकीत वेतन राहू नये याची काळजी शिक्षण विभागाने घ्यावी.- संतोष आयरे, राज्य उपाध्यक् ष,खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघया थकीत वेतनाबाबत वर्षभर निवेदने, आंदोलने, आदींद्वारे शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला. त्याला यश मिळाल्याचा आनंद आहे. या आदेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे एक हजार शिक्षकांचा थकीत वेतन, अन्य देयके अदा करण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. थकीत वेतनाच्या मंजुरीसाठी शिक्षण संचालकांच्या परवानगीचा जुलै २०१७ चा आदेश रद्द करण्यासाठी संघातर्फे पाठपुरावा केला जाणार आहे.- राजेश वरक, अध्यक्ष,माध्यमिक शिक्षक संघमाध्यमिक शिक्षकांचे थकीत असलेले वेतन, देयके अदा करण्याचा आदेश गुरुवारी (दि. २९) आमच्या कार्यालयाला प्राप्त झाला. त्यानुसार कार्यवाही सुरू असून, दि. ४ अथवा ५ एप्रिलपर्यंत वेतन आणि अन्य देयके अदा केली जातील.- शंकरराव मोरे, माध्यमिक वेतन पथक अधीक्षक, कोल्हापूर.