शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! तुफान गर्दी, प्रचंड उत्साह, वरळी डोममध्ये काय घडतंय?
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
4
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
5
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
6
"मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
7
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
8
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
9
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला भक्तिरंगात न्हाऊन निघा; प्रियजनांना पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश!
10
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
11
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
12
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
13
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
14
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
15
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
16
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
17
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
18
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
19
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
20
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!

तिकीट तपासनीसाकडून मारहाण

By admin | Updated: June 3, 2015 01:06 IST

पोलिसात तक्रार : महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील घटना

मिरज : मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये तिकीट तपासनीसाने प्रवीण रामचंद्र वसेकर (वय ३६, रा. दियेवाडी, ता. शिराळा) यांना विनातिकीट प्रवास करीत असल्याने धावत्या रेल्वेत मारहाण केली. याबाबत प्रवीण वसेकर या प्रवाशाने मंगळवारी मिरज रेल्वे पोलिसांत तक्रार दिली आहे. पुण्यातील खासगी कंपनीत नोकरी करणारे प्रवीण वसेकर सोमवारी रात्री कोल्हापूर स्थानकात महालक्ष्मी एक्स्प्रेस सुटताना रेल्वेत चढल्याने त्यांच्याकडे तिकीट नव्हते. वळीवडे स्थानकाजवळ कृष्णा माने या तिकीट तपासनीसाने त्यांना तिकिटाची विचारणा केली व ते विनातिकीट असल्याने साडेतीन हजार रुपये दंड भरण्यास फर्माविले. प्रवीण वसेकर यांनी दोन हजार रुपये दंड भरण्याची तयारी दर्शविली. मात्र तिकीट तपासनीस माने याने दंड कमी करण्यास नकार दिल्याने दोघांत बाचाबाची झाली. माने यांनी रेल्वेतील सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करून वसेकर यांना पोटात व तोंडावर ठोसे मारल्याची तक्रार आहे. मारहाणीमुळे वसेकर यांच्या कानाला दुखापत झाली असून त्यांनी तिकीट तपासनीस कृष्णा माने याच्याविरुध्द मिरज रेल्वे पोलिसांत मारहाणीची तक्रार दिली आहे. रेल्वे तिकीट तपासनीस व प्रवाशांत हाणामारीचे प्रकार वारंवार घडत आहेत. तिकीट तपासनीसांना नियमानुसार कारवाईच्या सूचना देण्यात आल्या असतानाही, प्रवाशांना मारहाणीच्या तक्रारी येत असल्याने याबाबत विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (वार्ताहर)