शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

सांगलीत तीन तरुण अभियंते ठार

By admin | Updated: July 8, 2017 01:26 IST

मोटार झाडावर आदळली; मृतात सोन्याची शिरोलीचा युवक

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करून परतताना भरधाव मोटार रस्त्याकडेच्या झाडावर आदळल्याने तीन तरुण अभियंते ठार, तर दोघे जखमी झाले. सांगलीतील पुष्पराज चौकात जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर गुरुवारी मध्यरात्री पावणेदोन वाजता हा अपघात झाला. मोटारीचा पुढील टायर फुटल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज विश्रामबाग पोलिसांनी व्यक्त केला आहे. विकी अंकुश चव्हाण (वय २४, रा. यशवंतनगर, सांगली), सम्मेद भारत निल्ले (२६, जैन गल्ली, सोन्याची शिरोली, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) व निनाद राजेंद्र आरवाडे (२२, एस.टी. कॉलनी, विश्रामबाग, सांगली) अशी मृतांची नावे आहेत. मोटारीचा चालक नितांत राजेंद्र बुटाले (२६, पत्रकारनगर, सांगली) व सुनील महावीर मडके (२२, कवठेपिरान, ता. मिरज) हे जखमी झाले आहेत. बुटाले याची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर सांगली येथील शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मडके किरकोळ जखमी झाला होता, त्याला उपचारानंतर घरी सोडले आहे. विकी, निनाद, सम्मेद आणि वृषभ (पूर्ण नाव समजू शकले नाही) चांगले मित्र असून, वृषभचा गुरुवारी वाढदिवस होता. त्यामुळे वाढदिवस साजरा करण्यासाठी चौघेही सांगली-मिरज रस्त्यावरील वानलेसवाडी येथील हॉटेल ‘खवय्या’मध्ये गेले. त्यांचा आणखी एक मित्र असलेला नितांत बुटाले बांधकाम व्यावसायिक आहे, तर सुनील मडके त्याच्याकडे सुपरवायझर आहे. सध्या नितांत याचे दुधगाव (ता. मिरज) येथे बांधकाम सुरू आहे. बांधकामासाठी खडी लागणार असल्याने तो सुनीलसह गुरुवारी रात्री खडी आणण्यासाठी टोप-संभापूर (जि. कोल्हापूर) येथे गेला होता. तेथे त्याला दूरध्वनी आला आणि वृषभचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यालाही बोलावण्यात आले. त्यानुसार तो आणि सुनील वानलेसवाडी येथे आले. तेथील हॉटेलमध्ये केक कापून जेवण केल्यानंतर रात्री दीड वाजता सर्वजण हॉटेलमधून बाहेर पडले. वृषभ त्याच्या घरी गेला. उर्वरित पाचजण मोटारीतून (क्र. एमएच ०२ एवाय ४९१) सांगलीकडे निघाले. नितांत मोटार चालवित होता, त्याच्या बाजूला सुनील बसला होता, तर तिघेही मृत पाठीमागील सीटवर बसले होते. मोटार भरधाव वेगाने सांगलीकडे येत होती. प्रथम मार्केट यार्डजवळील गतिरोधकावर मोटार जोरात आदळली. तेथे बुटालेचा मोटारीवरील ताबा सुटला होता. तरीही तो त्याच वेगाने पुढे आला. जिल्हा बँकेसमोर आल्यावर त्याचा पुन्हा ताबा सुटल्याने मोटार रस्त्याकडेच्या झाडावर जाऊन आदळली. मोटार एवढ्या जोरात आदळली की, पाठीमागे बसलेल्या तिघांना बाहेरही पडता आले नाही. ते तिघे एकमेकांवर जोरात आदळले. मोटारीची मागची बाजू पूर्णपणे चेपली गेली. एका वाहनधारकाने हा अपघात पाहिला. त्याने पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षाला कळविल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. विकी चव्हाण, सम्मेद निल्ले यांना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. निनाद आरवाडेला मिरजेला नेण्यात येत होते; परंतु त्याचाही वाटेतच मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त समजताच मृतांच्या नातेवाइकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. पाठलागाच्या भीतीची चर्चाविश्रामबाग चौकात मोटार आल्यानंतर गस्तीवरील पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोटार तशीच भरधाव वेगाने पुढे गेली. पोलीस पाठलाग करतील या भीतीने नितांतने वेग वाढविला. पुढे ती गतिरोधकांवर आदळली आणि शेवटी नियंत्रण सुटून झाडावर आदळली, अशी चर्चा घटनास्थळी आणि अपघातग्रस्तांच्या नातेवाइकांमध्ये सुरू होती. पोलीस निरीक्षक राजेंद्र मोरे यांनी मात्र याचा इन्कार केला. ते म्हणाले की, पोलिसांनी कोणत्याही मोटारीला थांबविले नाही. पाठलागाची केवळ अफवा आहे.सम्मेद, निनाद एकुलते एक मूळ राधानगरी तालुक्यातील सम्मेद निल्ले अभियांत्रिकी पदविकेचे (डिप्लोमा) शिक्षण पूर्ण करून पदवीचे शिक्षण घेत होता. सांगलीतच राहून तो एका दुचाकीच्या शोरूममध्ये नोकरीही करीत होता. त्याचे वडील शेतकरी असून, त्याला दोन विवाहित बहिणी आहेत. निनाद आरवाडेनेही त्याच्यासोबतच लठ्ठे पॉलिटेक्निकमध्ये डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले होते. तो दिल्ली येथे नोकरीस होता. हे दोघेही आई, वडिलांना एकुलते एक होते. त्यांच्या अपघाती मृत्यूने नातेवाइकांना मोठा धक्का बसला. विकी चव्हाण यानेही अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्याच्या वडिलांचे येथील यशवंतनगरमध्ये नाष्टा सेंटर आहे. त्याला एक लहान भाऊ आहे. विकीने पुण्यात बीबीएसाठी प्रवेश घेतला होता. शुक्रवारी तो पुण्याला जाणार होता. मात्र, त्यापूर्वीच त्याच्यावर काळाने घाला घातला. स्वप्न अधुरेच...राधानगरी : एकुलत्या तरुण मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने सोन्याची शिरोली (ता. राधानगरी) येथील निल्ले कुटुंबावर जणू आभाळच कोसळले आहे. शिक्षण घेत असलेल्या एका तरुणाचे अभियंता बनण्याचे स्वप्न अर्धवटच राहिले आहे. कार अपघातात जागीच मृत झालेल्यासम्मेद भारत निल्ले याच्या कुटुंबावर ही दुर्दैवी वेळ आली आहे.विमा प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या भरत निल्ले यांचा सम्मेद हा एकुलता मुलगा होता. शांत, मनमिळावू व हुशार असलेला सम्मेद सांगलीतील एका नामवंत अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल शाखेच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. कामानिमित्त सांगलीत असलेला त्याचा चुलत भाऊ चैतन्य निल्ले व प्रतीक करगावे यांना अपघाताची माहिती पहाटे मिळाली. त्यांनी गावाकडे याची माहिती दिली. किरकोळ अपघात झाल्याचे सांगून त्याच्या आई-वडील व काही नातेवाईकांना तिकडे बोलवून घेतले. रुग्णालयातील सोपस्कार पूर्ण झाल्यावर सकाळी दहाच्या दरम्यान मृतदेह ताब्यात मिळाला. दुपारी दोन वाजता सोन्याची शिरोली येथे त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकुलत्या मुलाचा मृत्यू झाल्याने सम्मेदच्या आई, वडील व विवाहित असलेल्या दोन बहिणींनी केलेला आक्रोश पाहून हळहळ व्यक्त होत होती.