शहरं
Join us  
Trending Stories
1
मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
2
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
3
"माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
4
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
5
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
6
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
7
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
8
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
9
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...
10
दिवाळीला बायकोला द्या स्कूटर गिफ्ट! ८०,००० रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये मिळतायेत बेस्ट पर्याय
11
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
12
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
13
Chaitanyananda Saraswati : "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती
14
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
15
GST नंतर आता तुमचा EMI स्वस्त होणार? RBI च्या पतधोरण समितीची बैठक आजपासून, रेपो दरात किती कपात
16
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
17
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
18
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
19
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
20
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?

कॅनॉलमध्ये बुडून तीन भावंडांचा मृत्यू

By admin | Updated: May 22, 2016 00:36 IST

सदर बझारमधील हृदयद्रावक घटना : कपडे धुण्यासाठी गेल्यानंतरचा प्रकार

सातारा : येथील कण्हेर उजव्या कालव्यामध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या लक्ष्मी टेकडी येथील तीन भावंडांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. मृतांमध्ये एका मुलासह दोन मुलींचा समावेश असून, तिघेही सख्खी भावंडे आहेत. या घटनेमुळे लक्ष्मी टेकडी व सदर बझार परिसरावर शोककळा पसरली आहे. लक्ष्मी शंकर पत्तार (वय ११), उमाश्री शंकर पत्तार (९), संतोष शंकर पत्तार (८, सर्व रा. लक्ष्मी टेकडी, सदर बझार, सातारा. मूळ रा. पडघानूर, ता. सिंदगी, जि. विजयपूर, कर्नाटक) अशी बुडून मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शंकर पत्तार व पत्नी रेणुका हे दाम्पत्य बिगारी काम करतात. गेल्या वीस वर्षांपासून त्यांचे वास्तव्य लक्ष्मी टेकडी येथे आहे. मुलगी उमाश्री, मोठा मुलगा मंजुनाथ आणि लक्ष्मी हे पडघानूर येथे गावाला आजी-आजोबांकडे राहायला असतात. तसेच मंजुनाथही बिगारीचे काम करतो, तर धाकटा संतोष हा आई-वडिलांकडेच राहायला होता. या मुलांना शाळेला सुट्या लागल्याने त्यांना सांभाळायला रेणुका यांची आई गावावरून आली होती. दरम्यान, शनिवारी दुपारी ‘कपडे धुण्यासाठी जाते,’ असे आजीला सांगून लक्ष्मी कॅनॉलकडे गेली. तिच्या पाठोपाठ संतोष आणि उमाश्री ही दोघे भावंडेही गेली. लक्ष्मी कॅनॉलच्या काठावर कपडे धूत असतानासंतोष आणि उमाश्री पाण्यात पोहण्यासाठी उतरले; मात्र त्या ठिकाणी भोवरा असल्याने दोघांनाही अंदाज आला नाही. त्यामुळे दोघेही बुडू लागले. हा प्रकार लक्ष्मीच्या निदर्शनास आल्यानंतर तिने पाण्यात उडी मारली. त्या दोघांना वाचविण्याचा प्रयत्न करत असतानाच दोघांनीही तिला भीतीने घट्ट मिठी मारली. त्यामुळे तिला काहीच करता आले नाही. काही क्षणातच तिघांनाही आपला जीव गमवावा लागला. ही घटना घडली तेव्हा एक लहान मुलगा कॅनॉलच्या काठावर होता. त्याने हा सर्व प्रकार घरी जाऊन आजीला सांगितला. त्यानंतर सगळ्यांची धावाधाव सुरू झाली. स्थानिकांनी कालव्यात शोधमोहीम सुरू केली. घटनास्थळापासून अर्धा किलोमीटर अंतरावर तिघांचे मृतदेह आढळून आले. ...अखेर लक्ष्मीची झुंज ठरली अपयशी कपडे धुण्यासाठी गेलेल्या लक्ष्मीसोबत तिचे भाऊ संतोष आणि उमाश्री देखील गेले होते. लक्ष्मी काठावर बसून कपडे धूत असतानाच संतोष आणि उमाश्री पाण्यात पोहण्यासाठी उतरले; मात्र भोवऱ्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. यावेळी दोघांना वाचविण्यासाठी अवघ्या अकरा वर्षांच्या लक्ष्मीने पाण्यात उडी घेतली. दोघांनाही बाहेर काढण्याचा ती प्रयत्न करत होती; मात्र घाबरलेल्या दोघांनी तिला मिठी मारल्याने तिघांनाही प्राणाला मुकावे लागले. भावंडांना वाचविण्यासाठी लक्ष्मीने दाखविलेले धाडस वाखणण्याजोगे होते. मात्र, तिची झुंज अपयशी ठरल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.