कोल्हापूर : कोल्हापूर शहरात संचारबंदी असतानाही आपले व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या तीन दुकानदारांची दुकाने महापालिका परवाना विभागाने सील केली, तर नऊ दुकानदारांकडून १३ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
बाजार गेट परिसरातील गंगाधर आगरवाल, महाराष्ट्र कटलरी व डायमंड किचन वेअर ही तीन दुकाने सकाळी ११ वाजल्यानंतरही सुरू ठेवल्याने त्यांच्यावर परवाना विभागाच्यावतीने सीलबंदची कारवाई करण्यात आली. चार जनरल स्टोअर्स, एक नाष्टा सेंटर, दोन बेकरी, एक बार, एक हॉटेल अशा नऊ दुकानदारांकडून १३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
शाहूपुरी येथील शेख जनरल स्टोअर्स, ओम साई नाष्टा सेंटर, मार्केट यार्ड येथील आर. आर. बॉडी बिल्डर, सीबीएस स्टॅण्ड येथील सनरेज परमिट रुम, प्रसन्न बेकरी व कावळा नाका येथील तंदूर हॉटेल यांना प्रत्येकी एक हजार रुपये, पद्मा टॉकीज येथील महालक्ष्मी एंटरप्रायजेस, मोरया एंटरप्रायजेस यांना प्रत्येकी दोन हजार रुपये, तर गजानन बेकरी यांना तीन हजार रुपयांचा दंड करण्यात आला.