शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरातील ओपन बारवर पोलिसांच्या धाडी, तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 18:28 IST

कोल्हापूर : शहरातील रिकाम्या मैदानांवर रात्री सुरू असणाºया विविध ‘ओपन बार’वर पोलिसांनी छापे टाकले. शुक्रवारी रात्री अचानक पडलेल्या धाडीने खुलेआम दारू ढोसत बसलेल्या तळीरामांनी कारवाईच्या भीतीने धूम ठोकली; तर सिद्धार्थनगर कमानीजवळ अंधारात उघड्यावर दारू पीत बसणाºया तिघांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली.संशयित वैभव दीपक लिगाडे (वय २९), गणेश दगडू कांबळे (२९), ...

ठळक मुद्देकारवाईच्या भीतीने तळीरामांची धूम चौकांत नाकाबंदी करून ड्रंक अ‍ॅँड ड्राइव्ह मोहीम रिकाम्या मैदानांवर ठिकाणांची झाडाझडती

कोल्हापूर : शहरातील रिकाम्या मैदानांवर रात्री सुरू असणाºया विविध ‘ओपन बार’वर पोलिसांनी छापे टाकले. शुक्रवारी रात्री अचानक पडलेल्या धाडीने खुलेआम दारू ढोसत बसलेल्या तळीरामांनी कारवाईच्या भीतीने धूम ठोकली; तर सिद्धार्थनगर कमानीजवळ अंधारात उघड्यावर दारू पीत बसणाºया तिघांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली.

संशयित वैभव दीपक लिगाडे (वय २९), गणेश दगडू कांबळे (२९), आशिष नंदकुमार बनगे (२६, तिघे रा. सिद्धार्थनगर, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून दारूच्या बाटल्या, ग्लास जप्त केला.

शहरातील खेळांची मैदाने ओपन बार बनली आहेत. मैदानावर दारूच्या रिकाम्या बाटल्या फोडल्यामुळे खेळाडूंना व फिरण्यासाठी येणाºया नागरिकांना त्याचा त्रास होतो आहे. शहरात फोफावलेल्या ओपन बार, मटका, जुगार यांसह अवैध धंद्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सर्वपक्षीय नागरी कृती समितीने विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार नांगरे-पाटील यांनी शहरातील खेळांची, शाळांची मैदाने, रस्त्यांचे पदपथ, पर्यटनस्थळी दिवस-रात्र सुरू असणाºया ओपन बारवर खुलेआम दारू ढोसत बसलेल्या तळीरामांना ठोकून काढा, असे आदेश पोलिसांना दिले.

जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी या चार पोलीस ठाण्यांतील गुन्हे शाखेचे कर्मचारी शुक्रवारी रात्री बाहेर पडले. पंचगंगा घाट, ब्रह्मपुरी, शिवाजी स्टेडियम, गांधी मैदान, तपोवन, पेटाळा मैदान, रंकाळा खणीकडील मागील बाजू, जुना वाशी नाकाजवळील रिकामी जागा, पुईखडी, ताराराणी विद्यालय (मंगळवार पेठ), ब्रह्मपुरी, शाहू दयानंद हायस्कूल मैदान, हॉकी स्टेडियम (ध्यानचंद स्टेडियम), आदी ठिकाणांची झाडाझडती घेतली.

पोलीस आल्याचे पाहून तळीराम अंधाराचा फायदा घेत पसार झाले; तर सिद्धार्थनगर येथील कमानीजवळ अंधारात वैभव लिगाडे, गणेश कांबळे, आशिष बनगे असे तिघेजण दारू पीत बसले होते. लक्ष्मीपुरीचे गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दादाराव पवार यांनी या ठिकाणी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर मुंबई दारूबंदी कायदा कलम ६६ (ब) प्रमाणे कारवाई केली.

ड्रंक अ‍ॅँड ड्राइव्ह

ओपन बारवरील कारवाईदरम्यान शहरातील महत्त्वाच्या चौकांत नाकाबंदी करून ड्रंक अ‍ॅँड ड्राइव्ह मोहीम राबविण्यात आली. यावेळी वाहनातील गॅस किटच्या तपासणीसह लायसेन्स, वाहनांची कागदपत्रेतसेच मद्यपान करून वाहन चालविणाºयांची ब्रेथ अ‍ॅनालायझर यंत्राद्वारे तपासणी केली गेली. यावेळी शिवाजी पूल येथे वैभव बबन कांबळे (३०, रा. कनाननगर) हा मद्यपान करून दुचाकी चालवीत असताना आढळून आला.