शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

शिवाजी विद्यापीठात तीन नव्या इमारतींची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 12:07 IST

शिवाजी विद्यापीठात नव्याने बांधण्यात आलेल्या तीन इमारतींचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गुुरुवारी (दि. १२) करण्यात आले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते, तर प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के प्रमुख उपस्थित होते.

ठळक मुद्देरसायनशास्त्र अधिविभाग, दोन वसतिगृहांचा समावेशचंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात नव्याने बांधण्यात आलेल्या तीन इमारतींचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गुुरुवारी (दि. १२) करण्यात आले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते, तर प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के प्रमुख उपस्थित होते.शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागासाठी नूतन विस्तारित इमारत बांधण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ‘कमवा व शिका’ योजनेंतर्गत मुलींच्या वसतिगृहाची इमारत आणि संशोधक विद्यार्थी वसतिगृहासाठी इमारत अशा एकूण तीन इमारती बांधण्यात आल्या आहेत. रसायनशास्त्र अधिविभागाच्या विस्तारित इमारतींचे पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण झाले आहे. याअंतर्गत तळमजल्याचे ८१६.२९ चौरस मीटर क्षेत्रफळाइतके बांधकाम पूर्ण झाले आहे.

संशोधक विद्यार्थी वसतिगृहाच्या इमारतीचे तळघर अधिक तळमजला असे बांधकाम विद्यापीठाच्या स्वनिधीमधून करण्यात आले आहे. एकूण १२९१.०२ चौरस मीटर इतके बांधकाम करण्यात आले आहे. त्या ठिकाणी एकूण १०० संशोधक विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था होणार आहे.

इमारतींच्या उद्घाटन कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी. टी. गायकवाड, अधिष्ठाता डॉ. पी. डी. राऊत, ए. एम. गुरव, लोबाजी भिसे, सिनेट सदस्य पंकज मेहता, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक संजय परमाणे, व्यवस्थापन परिषद सदस्य राहुल चिकोडे, अमित कुलकर्णी, विद्यापीठाचे अधिकारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी आदी उपस्थित होते. 

‘रुसा’चे अनुदान‘कमवा व शिका’ योजनेंतर्गत तीनमजली इमारतींचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. तळमजला विद्यापीठाच्या स्वनिधीतून, तर वरील दोन मजले राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाच्या (रुसा) अनुदानातून बांधण्यात आले आहेत. १३७१ चौरस मीटर इतके क्षेत्रफळ आहे. येथे सुमारे १५० विद्यार्थिनींची निवास व्यवस्था आहे. सर्व इमारतींचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर