कोल्हापूर : कोडोलीहून कोतोलीकडे ओम्नी कारमधून देशी-विदेशी मद्याचा साठा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दोघा तरुणांना वाघबीळ-पडवळवाडी फाटा येथे करवीर पोलिसांनी रंगेहात पकडले. संशयित आरोपी सागर प्रकाश महापुरे (वय २९, रा. कोडोली, ता. पन्हाळा), प्रवीण मोहन माने (२०, रा. बोरपाडळे, ता. पन्हाळा) अशी त्यांची नावे आहेत. यावेळी त्यांच्याकडून कारसह सुमारे तीन लाखांचा मद्यसाठा जप्त केला. ही कारवाई आज, रविवारी दुपारी चारच्या सुमारास करण्यात आली. याबाबत पोलिसांनी सांगितले की, मसूदमाले-वाघबीळमार्गे बेकायदेशीर देशी-विदेशी मद्याचा साठा कोतोली परिसरात विक्रीसाठी दोन तरुण ओम्नी कारमधून घेऊन जात असल्याची माहिती खबऱ्याद्वारे पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांना मिळाली होती. त्यानुसार ते एका खासगी कारमधून दुपारी चारच्या सुमारास वाघबीळ-पडवळवाडी येथे गेले. (पान ४ वर)
तीन लाखांचा मद्यसाठा जप्त; दोघांना अटक
By admin | Updated: June 30, 2014 00:51 IST