शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

‘चित्री’च्या वसाहतीसाठी तीन स्वतंत्र ग्रामपंचायती

By admin | Updated: May 15, 2015 23:37 IST

वसाहतींमधील प्रकल्पग्रस्तांची राजकीय गुलामगिरी संपुष्ठात येण्याचा मार्ग खुला झाला आहे.

ज्योतीप्रसाद सावंत -आजरा -चित्री प्रकल्पातंर्गत येणाऱ्या रायवाडा आवंढी व चित्रानगर य वसाहतींचे स्वतंत्र ग्रामपंचायतींमध्ये रूपांतर करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून, १५ आॅगस्ट २०१५ रोजी स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झेंडा फडकवण्याबरोबरच वसाहतींमधील प्रकल्पग्रस्तांची राजकीय गुलामगिरी संपुष्ठात येण्याचा मार्ग खुला झाला आहे.अपुऱ्या लोकसंख्येच्या निकषाचे कारण पुढे करून प्रकल्पग्रस्तांच्या या वसाहती लगतच्या ग्रामपंचायतींना जोडण्यात आल्या होत्या. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर व कॉ. संपत देसाई यांनी याला प्रचंड विरोध करीत राज्यभरातील प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतींकरिता एक हजार लोकसंख्येचा निकष बाजूला ठेवून ३५० लोकसंख्येकरिता प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतींकरिता स्वतंत्र ग्रामपंचायती करण्याच्या मागणीवर ठाम राहत गुढी आंदोलन उभारले होते.या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींना दर्जा देण्याबाबत निर्णय झाला; पण पुढील प्रक्रिया थांबली होती. गेले महिनाभर पुन्हा ‘श्रमुद’ने कार्यवाहीसाठी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मंत्री, आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या पातळीवर बैठका सुरू होत्या. प्रकल्पग्रस्तांची गावठाणे मंजूर झाली; परंतु महसूल गाव रूपांतरण प्रक्रिया थांबली होती. अखेर या बैठकांमध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात आला. यामध्ये चित्री प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गावठाण्यांना प्राधान्य देण्याचेही ठरले आहे. यामुळे आवंढी व चित्रानगर गावठाणांचे स्वतंत्र ग्रामपंचायतीमध्ये रूपांतरण करण्यास काहीच अडचण राहिलेली नाही. शिवाय रायवाड्याचीही स्वतंत्र ग्रामपंचायत होणार आहे. गुलामगिरी संपुष्टात : देसाईप्रकल्पग्रस्तांच्या वसाहतींना स्वतंत्र ग्रामपंचायतींचा दर्जा नसल्याने या वसाहतींवर एखादा राजकीय गट अथवा पक्ष आपले वर्चस्व ठेवू पाहत असे; परंतु या वसाहतींना स्वतंत्र ग्रामपंचायतींचा दर्जा मिळाल्याने प्रकल्पग्रस्तांची राजकीय गुलामगिरी संपुष्टात येणार असल्याचे कॉ. संपत देसाई यांनी स्पष्ट केले.