शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: मदतीची गरज असल्याचे वृत्त वाचले; तिघे वृद्ध जोडीदार एकत्र आले, अन् कांबळे कुटुंबाचा आधार बनले

By विश्वास पाटील | Updated: August 16, 2023 19:01 IST

हातावरील पोट असताना तीन मुली झाल्या. कष्ट करून त्यांना लहानाचे मोठे करत असताना अचानक त्यांची दृष्टी कमी आली

कोल्हापूर : गिरगाव (ता. भुदरगड) येथील कुटुंबाला मदतीची गरज असल्याचे वृत्त वाचून तीन ज्येष्ठ नागरिक एकत्र आले..एसटीने ते गाव शोधत गेले..आणि त्या कुटुंबाला तब्बल सात वर्षे ते दरमहा मदत करत आहेत. या मदतीचा तानाजी कांबळे कुटुंबाला मोठा आधार मिळाला. त्यातील एका मुलीस आज गुरुवारी सकाळी ११ वाजता येथील आरबीएल बँकेतर्फे सायकल भेट देण्यात येत आहे. किती रकमेची मदत केली यापेक्षा अडचणीच्या काळात कोणी तरी तुमच्या पाठीशी उभे राहते ही भावना मोठी असते, तेच या तिघांनी केले.घडले ते असे : हातावरील पोट असताना वंदना आणि तानाजी यांना तीन मुली झाल्या. कष्ट करून त्यांना लहानाचे मोठे करत असताना अचानक त्यांची दृष्टी कमी आली. ते कमी की काय म्हणून अशातच तानाजी यांचे निधन झाले. हा त्यांच्या वाट्याला आलेला दुर्दैवाचा फेरा वाचून येथील लक्ष्मीपुरीतील रवींद्र देशिंगे (वय ७७), बांधकाम व्यावसायिक प्रशांत मुंचडी (वय ८७) आणि निवृत्त प्राध्यापक आर. एन. हर्डीकर (वय ८८) हे एकत्र आले. त्यांना शोधत ते एसटीने गिरगावला गेले. घर पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी गावातीलच आर. बी. शेटके यांच्या किराणा दुकानात खाते घातले. त्यांना दरमहा एक हजार रुपयांचे किराणा साहित्य देण्याची व्यवस्था केली. वर्षातून एकदा कपडेही घेऊन देत असत. जून २०१५ पासून ही मदत ते करत आहेत. या मुलींना आयुष्यात दिसणारच नाही असे निदान एका डॉक्टरने केले होते. परंतु हे तिघे शांत बसले नाहीत. त्यातील देशिंगे यांचे सांगलीचे प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. दिलीप पटवर्धन हे खास मित्र. त्यांनी त्यांना शब्द टाकल्यावर दोन्ही मुलींवर त्यांनी एक पैसाही न घेता उपचार केले. त्यातून दोघींना चांगली दृष्टी आली. दीप ऑप्टिकल्सने त्यांना चष्मे दिले. त्यातील मोठ्या मुलीचे लग्न झाले. सानिका कॉलेजला जाते, ऋतिका आठवीत आहे. सानिकाला डोंगराळ भागातून रोज कॉलेजला चालत जावे लागते म्हणून देशिंगे यांनी आरबीएल बँकेला सांगितले. तो सायकल भेट कार्यक्रम आज गुरुवारी बँकेत होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर