शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अतिदुर्गम भागातील मुला-मुलींची उद्यापासून तीन दिवसीय सहल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 16:30 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील धनगर वस्त्यांसह अतिदुर्गम भागातील वाड्या वस्तींवरील शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना नागरी जीवन, विविध आस्थापना आणि शहरांची ओळख, नवी ऊर्जा मिळावी. अशा विविध उद्देशाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिल रायडर्स अ‍ॅडव्हेंचर फौंडेशन व संवेदना सोशल फौंडेशनतर्फे उद्या, शुक्रवारी (दि. २५) ते रविवारी (दि. २७) दरम्यान सहल आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती राहुल चिकोडे व प्रमोद पाटील यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देअतिदुर्गम भागातील मुला-मुलींची उद्यापासून तीन दिवसीय सहलहिल रायडर्स व संवेदना सोशल फौंडेशनचे आयोजन

कोल्हापूर : जिल्ह्यातील धनगर वस्त्यांसह अतिदुर्गम भागातील वाड्या वस्तींवरील शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना नागरी जीवन, विविध आस्थापना आणि शहरांची ओळख, नवी ऊर्जा मिळावी. अशा विविध उद्देशाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिल रायडर्स अ‍ॅडव्हेंचर फौंडेशन व संवेदना सोशल फौंडेशनतर्फे उद्या, शुक्रवारी (दि. २५) ते रविवारी (दि. २७) दरम्यान सहल आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती राहुल चिकोडे व प्रमोद पाटील यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.या सहलीत पाचवी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना सहभागी करून घेण्यात आले आहे. दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांना प्रशासकीय यंत्रणेमार्फत निर्देश पाठविण्यात आले आहेत. मागील वर्षीही अशा पद्धतीची सहल आयोजित करण्यात आली होती.

यंदा या उपक्रमात शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड या ६ तालुक्यांतून ३५ वाड्या-वस्त्यांवरील २०० मुले-मुली सहभागी होणार आहेत. यात दि. २५ ते २७ दरम्यान शिवाजी विद्यापीठ, भवानी मंडप, अंबाबाई मंदिर, टाऊन हॉल म्युझियम, न्यू पॅलेस म्युझियम, पोलीस मुख्यालय, शास्त्रीनगर, झेंडा गार्डन, शाहू साखर कारखाना, कणेरी मठ, गोकुळ दूध, पन्हाळा दर्शन, जेऊर येथील अ‍ॅडव्हेंचर पार्क, आदी ठिकाणांचे दर्शन व माहिती या मुलांना मार्गदर्शन देणार आहेत.

विशेष म्हणजे शाहू स्टेडियम येथे होणाऱ्या शासकीय ध्वजवंदन समारंभ व संचलन या कार्यक्रमात ही मुले पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. यात शिवतेज पाटील, वैभवी पाटील, श्रावणी पसारे, किमया लोणकर, ओंकार कारंडे हे सर्व या मुलांना माहिती देणार आहेत.

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर