कोल्हापूर : महानगरपालिकेच्या पाणीपट्टी विशेष वसुली धडक मोहिमे अंतर्गत शहरातील पाणीपट्टी थकबाकी भरणा न केलेल्या ५४ नळ कनेक्शनधारकांची कनेक्शन खंडीत करण्यात आली तर एक कोटी १३ लाख ९३ हजार ९४७ रुपयांची वसुली करण्यात आली. मागच्या आठ दिवसातील ही कारवाई आहे. तर मागच्या चोवीस तासात ऑनलाईन सुविधेद्वारे तीन कोटी २६ लाख ४६ हजार ६६१ इतक्या रक्कोचा भरणा झाला.पाणी पुरवठा विभागाकडे कार्यरत असलेल्या पाच वसुली पथकामार्फत दि. १ एप्रिल २०२० ते १९ मार्च २०२१ या कालावधीत ४१९ नळ कनेक्शन खंडीत केले असून चार कोटी ९७ लाख १३ हजार १३९ रुपये इतकी रक्कम वसुल केली आहे. तसेच स्पॉट बिल स्पॉट कलेक्शन अंतर्गत १ एप्रिल २०२० ते १८ मार्च २०२१ या कालावधीत एकूण २१ हजार १४९ नागरीकांनी चार कोटी तीन लाख तीन हजार ७५८ इतकी पाणीपट्टी भरली.पाणीपट्टी वसुलीची कारवाई प्रशासक कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जल अभियंता नारायण भोसले, पाणीपटटी अधीक्षक प्रशांत पंडत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वसुली पथक प्रमुख मोहन जाधव, शांताराम पोवार, पी.एस. माने, अमर बागल, संजय पाटील यांनी भाग घेतला.
चोवीस तासात ऑनलाईनद्वारे तीन कोटींचा भरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 19:00 IST
Muncipal Corporation Kolhapur-कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणीपट्टी विशेष वसुली धडक मोहिमे अंतर्गत शहरातील पाणीपट्टी थकबाकी भरणा न केलेल्या ५४ नळ कनेक्शनधारकांची कनेक्शन खंडीत करण्यात आली तर एक कोटी १३ लाख ९३ हजार ९४७ रुपयांची वसुली करण्यात आली. मागच्या आठ दिवसातील ही कारवाई आहे. तर मागच्या चोवीस तासात ऑनलाईन सुविधेद्वारे तीन कोटी २६ लाख ४६ हजार ६६१ इतक्या रक्कोचा भरणा झाला.
चोवीस तासात ऑनलाईनद्वारे तीन कोटींचा भरणा
ठळक मुद्देचोवीस तासात ऑनलाईनद्वारे तीन कोटींचा भरणा महापालिकेच्या पाणीपट्टी विशेष वसुलीला प्रतिसाद