शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

तीन चंदन तस्करांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 01:10 IST

कोल्हापूर : चिखली (ता. करवीर) येथील वन विभागाच्या रोपवाटिकेतील पाऊण कोटीच्या चंदनाची तस्करी करणाºया आंतरराज्य टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देआंतरराज्य टोळी; ६१ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त; अन्य बाराजण फरार वर्षभरात शहरात शिवाजी विद्यापीठ, न्यू पॅलेस, जिल्हाधिकारी निवासस्थान येथून काही चंदनाची झाडे चोरीला या तिघा आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची एक टीम मुंबई-भिवंडी येथे बारा दिवस तळ ठोकून होती.

कोल्हापूर : चिखली (ता. करवीर) येथील वन विभागाच्या रोपवाटिकेतील पाऊण कोटीच्या चंदनाची तस्करी करणाºया आंतरराज्य टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. संशयित मच्छिंद्र विलास बनसोडे (वय ३०, रा. गणेशनगर, रेठरे बुद्रुक, ता. कºहाड, जि. सातारा), संतोष सुग्रीव खुर्द (३५, रा. देगांव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर), इरफान अजीज बेग (४१, रा. वसदुर्गा, कर्नाटक) अशी त्यांची नावे आहेत.तस्करांच्या ताब्यातून १०० किलो चंदन तेल व ६४ किलो श्वेत चंदनाचे लहान-मोठे तुकडे असा सुमारे ६१ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीमध्ये आणखी बाराजणांचा समावेश असून, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

तस्करीचे मुख्य ठिकाण कर्नाटकमधील शिमोगा असून, कोल्हापूरसह सोलापूर, भिवंडी, पायधुनी, मुलुंड, आदी ठिकाणी जाळे पसरले आहे. या तस्करांना सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून, त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी दिली.चिखलीतील वनविभागाच्या रोपवाटिकेतील कर्मचाºयांना बांधून चोरट्यांनी पाऊण कोटीचा दरोडा टाकल्याचे उघडकीस आले होते. चंदन तस्करी करणाºयांची दहा ते बाराजणांची टोळी असून, ते पुणे-बंगलोर महामार्गावरील शिये येथील ढाब्यावर जेवण करून पुढे मार्गस्थ झाल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले होते. कर्नाटक-महाराष्टÑात परवानाधारक चंदनाचे तेल व गंध तयार करणारे कारखाने पोलिसांच्यारडारवर होते.

शोधमोहीम सुरू असताना पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांना खबºयाने चंदन दरोडा रेठरे बुद्रुक (ता. कºहाड, जि. सातारा) व किल्ले मच्छिंद्रगड (ता. वाळवा, जि. सांगली) येथील आरोपींनी त्यांच्या कर्नाटकातील काही साथीदारांसह मिळून टाकलेला आहे, अशी माहिती दिली. त्या दृष्ठीने माहिती घेतली असता संशयित मच्छिंद्र बनसोडे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने अन्य दहा ते बारा साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याचे दोन साथीदार संतोष खुर्द व इरफान बेग यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून १०० किलो चंदन तेल व ६४ किलो श्वेत चंदनाचे लहान-मोठे तुकडे असा ६१ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्'ातील अन्य आरोपी शिमोगा येथे लपून बसले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची एक टीम तळ ठोकून आहे. या तिघा आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची एक टीम मुंबई-भिवंडी येथे बारा दिवस तळ ठोकून होती. 

असा टाकला दरोडाचिखली येथील वनविभागाच्या रोपवाटिकेत कोट्यवधी रुपयांचे चंदनाचे लाकूड असल्याची टीप एका स्थानिक व्यक्तीने मच्छिंद्र बनसोडे याला दिली. बनसोडे हा चंदन तस्करीमधील मास्टर मार्इंड आहे. त्याने काही साथीदारांसोबतया रोपवाटिकेची तीन दिवस रेकी केली. त्यानंतर कºहाडमधून टेम्पो चोरला. तेथून हे सर्वजण १८ जुलैला कोल्हापुरात आले. स्थानिक व्यक्तीच्या मदतीने मार्केट यार्डमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा-कोबी खरेदी केला. तेथून ते मध्यरात्री रोपवाटिकेमध्ये आले.

येथील वन कर्मचारी संजय आनंदा सातपुते (वय ५० रा. जाफळे, ता. पन्हाळा), उत्तम निवृत्ती कांबळे (५२, रा. मिणचे, ता. हातकणंगले) व सातपुते यांचा मुलगा लक्ष्मण अशा तिघांना बांधून घालून साध्या चंदनाच्या लाकडांना हात न लावला तेल निर्मिती व रक्त चंदनाची लाकडे टेम्पोत भरली. अंधरात उजेड दिसण्यासाठी छोट्या बॅटºयांचा वापर केला. तेथून बाहेर पडत कसबा बावडा मार्गे शिये येथील एका धाब्यावर जेवण केले. त्यानंतर ते मिरज मार्गे संतोष खुर्द याच्या गावी देगांव येथे आले. याठिकाणी चोरीचा मुद्देमाल लपवून ठेवला. त्यानंतर अन्य साथीदार कर्नाटकातील शिमोगा येथे निघून गेले. त्यानंतर या सर्वांनी आपले मोबाईल नंबर बदलले होते. त्यामुळे पोलिसांना या सर्वांचे लोकेशन मिळविण्यात अडचणी येत होत्या.टिपर स्थानिकचंदनाची माहिती देणारा टिपर हा दरोड्यातील मुख्य सूत्रधार आहे. तो स्थानिक असून त्याच्या घरावर पोलिसांनी छापे टाकले आहेत. तो गुन्'ाची चाहूल लागल्यापासून पसार झाला आहे. लवकरच त्याच्यासह अन्य आरोपींना अटक केली जाईल. वर्षभरात शहरात शिवाजी विद्यापीठ, न्यू पॅलेस, जिल्हाधिकारी निवासस्थान येथून काही चंदनाची झाडे चोरीला गेली आहेत. या चोरीमागे या स्थानिक टिपरचा हात आहे का, त्यासंबधी माहिती घेतली जात आहे.