कुंभवडेतील पाचजणांना अटक, सुटकाकणकवली : तालुक्यातील कुंभवडे येथे बेकायदा जमाव करून व बंदूक दाखवून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कुंभवडेतील सहाजणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यापैकी पाचजणांना अटक करण्यात आली. शुक्रवारी या पाचजणांची जामिनावर मुक्तता झाली. याप्रकरणी सुशील वसंत बांदेकर (वय २६, रा. कुंभवडे, हेळेकरवाडी) याने तक्रार दिली होती. सुशील बांदेकर हा कनेडी बाजारपेठेत असताना पांडुरंग महादेव सावंत यांनी शिवीगाळ करून दमदाटी केली व गळ्याला पकडले. याचा जाब विचारण्यासाठी मित्रांसोबत पांडुरंग सावंत यांच्या घराकडे गेलो असताना पांडुरंग सावंत यांच्यासह काहीजणांनी आपण उभ्या असलेल्या ठिकाणी येऊन दगड मारले. तसेच निनाद सावंत यांनी आपल्या घरातील बंदूक आणून ठार मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार सुशील बांदेकर याने दिली होती. त्यानुसार पांडुरंग सावंत (वय ६५), गंगाराम सावळाराम तावडे (४४), विजय दत्ताराम कानडे (४०), रघुनाथ श्रीधर पेडणेकर (३०), संजय विठ्ठल सावंत (२८) या पाचजणांना कणकवली पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी केलेली संशयितांच्या कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळून लावत न्यायालयीन कोठडी दिली. त्यानंतर प्रत्येकी १० हजाराच्या जामिनावर संशयितांची मुक्तता केली. आरोपींच्यावतीने ॲड. हर्षद गावडे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)चौकटजिल्हा परिषद उपाध्यक्षपद काढून घ्यावे : वैभव नाईककुंभवडेतील एका युवकावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयाने जिल्हा परिषद उपाध्यक्ष गोट्या सावंत यांना पाच दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे. त्यामुळे त्यांचे पद काढून घ्यावे, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे केली आहे.पूर्वग्रहदूषित कारवाई : सतीश सावंत बोलेरो प्रकरणाचा राग ठेवत पोलीस यंत्रणेने पूर्वग्रहदूषितपणे ही कारवाई केली आहे. युवकाला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नसताना ३०७ कलम लावण्यात आलेले आहे, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत केला. यावेळी माजी आमदार राजन तेली उपस्थित होते.
बंदूक दाखवून ठार मारण्याची धमकी
By admin | Updated: May 3, 2014 17:09 IST