शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वकिलांच्या आंदोलनामुळे सहा हजार खटल्यांचे कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 11:47 IST

मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन होण्यासाठी खंडपीठ कृती समितीच्या ‘काम बंद आंदोलना’त पाच वर्षांपर्यंत प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांनी सहभागी घेतला. वकिलांनी सोमवारपासून न्यायालयीन कामकाजावर असहकार आंदोलनाची सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांत सहा हजार खटल्यांचे कामकाज ठप्प राहिले. 

ठळक मुद्देवकिलांच्या आंदोलनामुळे सहा हजार खटल्यांचे कामकाज ठप्प न्यायालयीन कामकाजावर असहकार आंदोलनाची सुरुवात

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन होण्यासाठी खंडपीठ कृती समितीच्या ‘काम बंद आंदोलना’त पाच वर्षांपर्यंत प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांनी सहभागी घेतला. वकिलांनी सोमवारपासून न्यायालयीन कामकाजावर असहकार आंदोलनाची सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांत सहा हजार खटल्यांचे कामकाज ठप्प राहिले. कसबा बावडा रोडवरील न्यायसंकुलाच्या प्रवेशद्वारावर मंडप टाकून आंदोलन सुरू आहे. येत्या ३० मार्चपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. दोन दिवसांत न्यायालयात होणाऱ्या एकाही सुनावणीसाठी वकील उपस्थित राहिले नाहीत. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर आणि रत्नागिरी बार असोसिएशनने न्यायालयीन कामकाजावर असहकार आंदोलन पुकारले आहे.कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन झाल्यास त्याचा मोठा फायदा ज्युनिअर वकिलांना होणार आहे. सध्या सहा जिल्ह्यांतील ६० हजारांहून अधिक खटले मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. सर्किट बेंचमुळे अनेक खटले मार्गी लागू शकतील, असे आंदोलनातील वकील योगेश हुपरीकर यांनी सांगितले.

आंदोलनात अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, उपाध्यक्ष आनंदराव जाधव, खजानिस सुशांत गुडाळकर, माजी अध्यक्ष विवेक घाटगे, प्रकाश मोरे, अजित मोहिते यांच्यासह धैर्यशील पवार, सुदर्शन पाटील, ओंकार देशपांडे, पी. जी. पाटील, रणजित साळोखे, नवतेज देसाई, हर्षवर्धन राणे, सचिन मुल्ला, सूरज भोसले, अक्षय कोरडे, राहुल शेळके, विक्रांत इंगवले आदी सहभागी झाले. खंडपीठ कृती समिती आंदोलनाला सातारा जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष रफिक शेख, मेनन आणि मेनन कामगार कर्मचारी संघटनेने सचिव सुरेश पाटील यांनी पाठिंबा दर्शविला. 

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर